रिफ्युजी आणि मिलिटंट्स यांच्या भीषण वास्तवतेच प्रभावी सादरीकरण :’उम्मिद’

६२ वी हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धा नाशिक- प्रवीण यशवंत

0

‘उम्मिद’ ; लेखक,दिग्दर्शक – अभिषेक लोकणार

लोकहीतवादी मंडळ नाशिक यांनी सादर केलेल्या ‘उम्मीद’ हे नाटक स्पर्धेत सादर झाले.

सिरिया,युक्रेन रशिया,गाझा येथील परिस्थितीशी आपण मीडिया मुळे परिचित आहोत अतिशय भीषण व्हिडीओ  फोटोज आपण सर्वांनी बघितलेय काही भारतीय नागरिक या ठिकाणी होतेच जे सुखरूप परत आले ते ही भयावह परिस्थिती त्यांचा अनुभव बऱ्याच लोकांनी ऐकलाय त्या परिस्थितीवरच हे नाटक.

मध्यपूर्व देशांमधल्या नागरी युद्धात वर्षानुवर्ष गुरफटलेल्या लोकांना युद्धादरम्यान येणार्या सामान्य जनजीवनातल्या समस्या,शिक्षण,प्रसंगी येणारी अस्थिरता या समांतर प्रश्नावर नाटक बोलते.
रिफ्युजी चे पलायना दरम्यान त्यांना करावा लागणारा एका भयावह परिस्थितीचा सामाना मानसिक व शाररिक हल्ले,मृत्यू,  भीती,जगण्यासाठीची पराकोटीची धडपड फार प्रखरतेने आपल्या समोर येते आणी प्रेक्षक म्हणून आपल्यालाही हादरवून टाकते,विचार करायला प्रवृत्त करते असे प्रभावी सादरीकरण ‘उम्मिद’ या नाटकाचे होते.

नाटक – एक कुटुंब नवरा,बायको त्यांच तान्ह बाळ आणि  एक शिक्षिका एकाच वेळी आपल गाव सोडून पलायन करता सामाजिक अस्थिरता त्यातून निर्माण झालेली भीती,पुढच्या क्षणी आपण जिवंत असू का असा प्रश्न, अशा परिस्थितीत स्थालांतर करताना त्या प्रवासात त्यांच्या बरोबर घडणाऱ्या भीषण घटणांची मालिका,आणि इच्छित स्थळी येईपर्यत त्यांची धगधग असंख्य मृत्यू दर्शन आणी नाटकाच्या शेवटी फक्त शिक्षिका जिवंत असते आणी परिस्थितीला बळी पडलेल्या त्या नवरा बायकोचे तान्हे बाळ शिक्षिकेच्या हातात असते इथे नाटक संपते. उत्तम,प्रभावी सादरीकरण ‘उम्मीद’चे.लेखकाने छान मांडणी केलीय

दिग्दर्शक – अभिषेक लोकणार यांनी उत्तम दिग्दर्शन केलय आणी त्यांना जो परिणाम साधायचा होता तो नेपथ्य व लाईट शिवाय शक्य नव्हते ही नाटकाची जमेची बाजूनाटकच्या प्रत्येक दृश्यात दिग्दर्शक आपल्याला दिसतो नाटकाचा उत्तम वेग जबरदस्त परिणाम साधतो ही दिग्दर्शक अभिषेक लोकणार यांच दिग्दर्शकीय भान उत्तम होत.

प्रकाश योजना -सागर पाटील यांनी अप्रतिम केली,अचूक,अभ्यापूर्व प्रकाश योजना युद्धजन्य भूमी,दहशत, भीती,सतत मृत्युचे सावट हे प्रकाश योजनाने साक्षात स्टेजवर जिवंत केले सागर पाटील यांनी ही नाटकाची अत्यंत जमेची बाजू

नेपथ्य – आदित्य समेळ यांनी केले  रिकाम्या स्टेजवर एक लेव्हल त्यावर खुंटलेल झाड या सूचकतेची ताकद म्हणजे ते एकाच वेळी स्थळ,काळ,वेळ,जिवंत करत होत असेच सजेस्टिव नेपथ्य नाटक भर वापरण्या आले जे अत्यंत नाटकाच्या गोष्टीसाठी प्रभावी होते, जोडीला प्रकाश योजना,नाटकात येणारी घर,शाळा,अतिरेक्यांचं स्थान,आणी प्रवासातील वेगवेगळी स्थळ खरंच हे घडतंय अस वाटन ही नेपथ्य,प्रकाश यांची जमेची बाजु होती.

संगीत संयोजन – अमेय जोशी यांचं होत जे परिस्थितील वास्तवता निर्माण करत होते भेदकता निर्माण करत होते,कुठे लाऊड नाही कर्कश नाही.नाटकाला साजेसे अप्रतिम संगीत संयोजन अमेय जोशी यांनी केलीय.

रंगभूषा,केशभूषा – स्वरांजली गुंजाळ यांनी केलीय नाटकातील पात्र त्यांनी जिवंत केलीय अभ्यास पूर्ण रंगभूषा ,केशभूषा केलीय.

वेषभूषा – रोहिणी जोशी यांनी केलीय नाटकाच्या गोष्टीला साजेशी अप्रतिम डिटेलिंग अशी वेशभूषा होती रोहिणी जोशी यांची.

रेहान – ची भूमिका करणारा सागर संत याने जबरदस्त भूमिका केलीय अगदी सहज अभिनय करता करता तो जगण्यातील भेदकता निर्माण करत होता अप्रतिम रोल सागर संत यांचा.

नुरीन – ची भूमिका रुपश्री कुलकर्णी यांनी केलीय एक आई,बायको आणी तीच्या भोंवतालची परिस्थिती त्यातून तिची झालेली अवस्था अर्थपूर्ण रित्या त्या अभिनयातून दाखवत होत्या जे नाटकातील प्रत्येक दृश्यात जाणवत होत,अप्रतिम रोल केलाय रुपश्री कुलकर्णी यांनी.

जिया- वैष्णवी लोकणार यांनी हा रोल केलाय नाटकातील या पात्राची अभ्यास पूर्ण भूमिका सादर केली वैष्णवी लोकणार यांनी.अप्रतिम अभिनय…

कलावंत- सागर संत,रुपश्री कुलकर्णी,वैष्णवी लोकनार,तन्मय भोळे, विनीत पंडित,तेजस मोहिते,सुविज्ञा बधान,मुक्ता शेपाळ,भक्ती नाईक,ईशान घोलप,ललित श्रीवास्तव,आदित्य समेळ,संकेत गोरवाडकर,युगा कुलकर्णी.विद्यार्थी,रेफ्युजीस – स्वानंदी पवार,साक्षी शिंगणे,भक्ती नाईक,ध्रुव शाह,वेदिका खर्डे,मुक्ता शेपालं,तेजस मोहिते.

मिलिटन्स –(अत्त्यंत सुंदर काम केलय ते ) -आदित्य ढमाले, रोशन चव्हाण, अथर्व जोशी,संकेत गोरावाडकर, ललित श्रीवास्तव,ध्रुव शहा,आदित्य समेळ.

लोकहितवादीं मंडळाच्या तरुणपिढीने राज्यनाट्य स्पर्धेत आपले सादरीकरण उत्तम केले.अनुभवी दिग्दर्शक मुकुंद कुलकर्णी यांचे मार्गदर्शनामुळे नाटकाने सादरीकरणातील सर्वोच्च पातळी गाठली .

प्रवीण यशवंत
मोबाईल – ७७६७८९४४३५

प्रवीण यशवंत

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.