युद्ध सारख्या गंभीर प्रश्नावरच एक अत्यंत तरल काव्यात्मक सादरीकरण “विनाशकाले” 

६३ वी मराठी राज्य हौशी नाट्य स्पर्धा ,नाशिक केंद्र

0

६३ व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत ११ डिसेंबर रोजी इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक शाखेकडून विनाशकाले हे नाटक सादर करण्यात आले. युद्ध सारख्या गंभीर प्रश्नावरच एक अत्यंत तरल काव्यात्मक लेखन असलेलं नाटक आज राज्य नाट्य स्पर्धेत इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक शाखेकडून विनाशकाले हे नाटक सादर झालं. लेखनाच्या जोडीला तितकच तोला मोलाचं दिग्दर्शन  आणि युद्धाची पार्श्वभूमी दाखवण्यासाठी केललेले कलात्मक नेपथ्य यामुळे हे नाटक जणू प्रत्यक्ष युद्ध भूमीवरच घेऊन गेले.

अचूक पात्र निवड व प्रत्येक कलावंताने आपापल्या पात्राला दिलेला न्याय हे नाटकाचे वैशिष्ट्य आहे. युद्धातील घटनांसाठी वापरलेले सुयोग्य पार्श्व संगीत आणि या सर्वांना मिळालेली दमदार दिग्दर्शनाची साथ यामुळे नाटकाच्या सुरुवातीपासूनच शेवटपर्यंत प्रेक्षक प्रेक्षागृहात खेळून बसले होते. या जगाच्या निर्मितीपासून युद्ध सतत निरंतर चालू आहेच. युद्ध हे केवळ दोन देशांमध्येच घडते असं नाही तर दोन माणसांमध्ये देखील सतत निरंतर युद्ध सुरू असते याचा प्रत्यय नाटक बघत असताना जागा येतो. का भांडतात माणसं ? कशासाठी ? कुठला अमर पट्टा ? याचा विचार करतच प्रेक्षागृहातून बाहेर पडतात. डॉक्टर लोकांनी सादर केलेली एक सर्वांग सुंदर कलाकृती म्हणजे विनाशकाले नाटक.

सध्याच्या वास्तव जागतिक परिस्थितीचे सादरीकरण आणि वैश्विक घटनेचा नाट्य प्रवासात केलेला वापर यामुळे प्रत्येक प्रेक्षकांपर्यंत हे नाटक सहजपणे पोहोचले. लेखनापासून अभिनयापर्यंत सर्व गोष्टी डॉक्टरांनी केलेल्या आहेत. या नाटकामुळे नाशिकच्या रंगकर्मींमध्ये त्यांचा ठसा उमाटला आहे.

नाटकाचे लेखन डॉ. राजीव पाठक तर दिग्दर्शन मुकुंद कुलकर्णी यांनी केले. नेपथ्य शैलेंद्र गौतम यांनी तर प्रकाशयोजना सागर पाटील यांची होती. पार्श्वसंगीत तेजस बिल्दीकर, रंगभूषा माणिक कानडे व वेशभूषा अपूर्वा शौचे यांची होती. नाटकामध्ये सम्राट – डॉ. सुहास कुलकर्णी, डॉक्टर मित्र –  राजेंद्र नेहते, गोल्डा – डॉ. प्राजक्ता भांबारे, मिनिस्टर – डॉ. सुमंत शिंपी, प्राजक्ता १ – डॉ. शशांक कुलकर्णी, प्राजक्ता २ – डॉ. नागेश गुरव, प्रियसी – डॉ. श्वेता भिडे, कमांडर – डॉ. राजेंद्र भंडारी, शास्त्रज्ञ डॉक्टर – डॉ. मोहन आमेसर, सैनिक – डॉ. विनय कुलकर्णी, ध्रुव शाह, तुषार बाविस्कर, निलेश कुर्णेकर, योगेश मुधवर, शाहरुख शेख, गिरीश पालीवाल, बातमीदार – डॉ. स्वप्न कुलकर्णी, नर्स – डॉ. गुंजन शिंपी यांनी भूमिका साकारल्या . या नाटकाचे निर्मिती प्रमुख डॉ. सुधीर संकलेचा हे होते.

दिगंबर काकड    
मो-९५९५९९६०३३   

आजचे नाटक – गौतमी
संस्था –  हस्टलेख्यम मैन्यूस्क्रिप्ट इन्स्टिट्यूट,नाशिक
लेखक आणि दिग्दर्शक -चैतन्य गायधनी

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.