बाप आणि मुली मधलं नातं उलगडणारे “वो फिर नहीं आते “
६३ वी मराठी राज्य हौशी नाट्य स्पर्धा ,नाशिक केंद्र
६३ वी राज्य हौशी नाट्य स्पर्धेत ५ डिसेंबर रोजी मथुरा बहुउद्देशीय विकास मंडळ, नाशिक या संस्थेचे वो फिर नहीं आते हे नाटक सादर करण्यात आले. या नाटकाच्या कथेतील आशय हा आजच्या काळात बऱ्याचसा बघायला मिळतो. अलीकडे अशा बऱ्याच घटना वाचण्यात आणि बघण्यात आल्या आहेत.या घटनांना कल्पनेची साथ देऊन वो फिर नही आते या नाटकात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मुलींना आयुष्यात जन्माला येण्याआधी पासूनच खुप संघर्ष करावा लागतो. त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे जगण्यासाठी घरातल्या आणि बाहेरच्या जगातल्या प्रत्येकाशी झगडावे लागतं. अजूनही बऱ्याच ठिकाणी घरात मुलीचा जन्म झाला, तर त्या मुलीला तिरस्कार सहन करावा लागतो. घरातलं मुलीचे स्थान, बाप आणि मुली मधलं नातं या विषयाला विनोदाची झालर लावून हलक्याफुलक्या पद्धतीने व विनोदाची पेरणी देऊन हे नाटक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न दिग्दर्शकांनी केला आहे.
नाटकाचे लेखन अतुल गायकवाड तर दिग्दर्शन हेमंत गवळे यांचे होते. संगीत कैलास शिरसाठ यांचे तर नेपथ्य रामेश्वर जाधव यांचे होते. रंगभूषा ललित कुलकर्णी, वेशभूषा कविता देसाई आणि प्रकाश योजना विनोद राठोड यांची होती. या नाटकामध्ये अविनाश – कैलास जाधव, आजोबा – रामेश्वर जाधव, शर्वरी – सोनल उमासुरेश, कामवाली – पूजा चव्हाण, मोठे अनू – तनिषा जाधव, छोटे आनू – समृद्धी गायकवाड, ऑर्केस्ट्रा मालक – संकेत चव्हाण, जाधव बाबा – अतुल गायकवाड व योगेश रणधिरे यांनी भुमिका साकारल्या.
दिगंबर काकड
मो-९५९५९९६०३३
आजचे नाटक – तीन दिवसांची पाहुणी
संस्था – महात्मा गांधी विद्यामंदिर,सौ.स्मिता हिरे परफॉर्मिंग आर्ट्स, नाशिक
लेखक,दिग्दर्शक -संगिता फुके -पवार