मुंबई, दि. २६ मे २०२५ – Maharashtra Transport Minister News राज्य परिवहन महामंडळाच्या भाडेतत्त्वावरील ५१५० इलेक्ट्रिक बस पुरवठा प्रकल्पावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. संबंधित कंपनी वेळेत बस पुरवठा करण्यात अपयशी ठरल्याने निविदा करार रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. ते आज एसटी महामंडळाच्या मुख्यालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत बोलत होते.
🚌 बस पुरवठ्यात गंभीर निष्काळजीपणा (Maharashtra Transport Minister News)
२२ मे २०२५ पर्यंत कंपनीला किमान १००० बसेस पुरवण्याचे सुधारित वेळापत्रक देण्यात आले होते.
मात्र,एकही बस उपलब्ध करून देता न आल्याने भविष्यातील विश्वसनीयतेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.
महामंडळाकडे सध्या बसेसची अत्यंत निकड असून, अशा निष्क्रिय संस्थेसोबतचा करार रद्द केला जावा, असे मंत्री सरनाईक यांनी स्पष्टपणे सांगितले.
🟢 शिवशाहीचे “हिरकणी”मध्ये रूपांतर
सध्या चालनात असलेल्या शिवशाही बसेसचे टप्प्याटप्प्याने पुनर्बांधणी करून “हिरकणी” निम-आराम बसेसमध्ये रूपांतर करण्यात यावे.
यावेळी बसेसना हिरव्या-पांढऱ्या रंगसंगतीतच ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
🚻 स्वच्छतेबाबत शून्य सहनशीलता
बसस्थानकांच्या भेटीत स्वच्छतेबाबत गंभीर अनास्था आढळून आली आहे.
विशेषतः महिला प्रवाशांच्या तक्रारी लक्षणीय असून, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास ते सहन केले जाणार नाही, असा सज्जड दम मंत्री सरनाईक यांनी भर सभेत दिला.