स्त्रियांची भावनिक घुसमट व्यक्त करणारे नाटक ‘माझा खेळ मांडु दे’ 

६२ वी मराठी राज्य नाट्य स्पर्धा ,नाशिक -प्रवीण यशवंत.

0

सई परांजपे लिखित या नाटकात सेवा श्रॉफ नावाची स्त्री जी एकटी राहते.गरजु स्त्रियांना पेइंग गेस्ट म्हणून त्या आपल्या घरात व्यवस्था करतात त्यांच राहत घर हे बऱ्या पैकी प्रशस्तपण आहे इथे पेइंग गेस्ट म्हणून राहणाऱ्या तीन स्त्रिया आहे त्यांची ही गोष्ट म्हणजे ‘माझा खेळ मांडु दे’ हे सई परांजपे लिखित नाटक होय.

या घरात राहणाऱ्या मामी ची गोष्ट म्हणजे अगदी कळत नसलेल्या वयात त्यांच्याच सख्या मामाने त्यांच केलेलं शाररिक शोषण आणी तिला काही उमाजण्याच्या आताच मामा तिच लग्न लावून देतो आणि तिचा नवरा पुढे नपूंसक असल्याचे कळते आणी याच काळात एका विचित्र स्थितीत सासु तिच्या पाठीवर अगदी प्रेमाने हात फिरवून सांगते नवऱ्याच्या जागी तु आता मामंजी ची सेवा कर तिसऱ्या रात्री मामी नावाच पात्र मामंजिचा खून करते पुढे हा खटला खूप गाजतो आणी पुढे बारा वर्ष मामी या मेंटल हॉस्पिटल मध्ये असता.ही मामी या पात्राची कहाणी.

पद्द्मिनीची गोष्ट म्हणजे ती अतिशय प्रतिकूल परिस्थितून शिक्षण पूर्ण करते आणी बँकेत नोकरी मिळवते चष्म्याचा जाड नंबर असल्या कारणाने तिचे लग्न जमत नाही. एका स्थळाला घरचे जुळवून घेता  आणी उरकूनच टाकता लग्न पण नवऱ्या मुलाचा हेतूच वेगळा असतो तिच्याशी लग्न करण्याचा तो तिच्या नोकरीच्या संबधित असतो.त्या मुलीचा बँकेतील तिचा पगार खूप नसतो पण तिच्या नावावर लोन  घेऊन फ्लॅट घेणे हा त्याचा उद्देश असतो तिच्याशी गोड बोलून तिला सुखाचे स्वतंत्र वेगळं बिऱ्हाड अशी स्वप्न दाखवून घराच उद्देश सफल करतो….

त्या नवीन घरात तो आपली मैत्रीण घेऊन येतो तीही तिथे राहू लागती परिस्स्थिती असह्य होऊन पद्द्मिनी तो फ्लॅट सोडते. पद्द्मिनीच्या अडचणीत तिला  कायम सपोर्ट करणारे मद्दत करणारे यशवंत भालेराव हे सदगृहस्थ पुढे यांच्या बायकोच्या आजारपणात पद्द्मिनी ही खूप मद्दत करते आपल हक्काच कोणी असल्या सारखे आणी पुढे हेच दोघ एकत्र येतात. ही पद्द्मिनी ची गोष्ट.

रिबेका ही मुलगी मर्सी मिशन जवळच्या उकिरड्यावर सापडते एका कापडात गुंडाळलेली तान्ही रिबेकाला केळीच्या आणि अंड्याच्या,केळीच्या कचऱ्यातून उपसून उकिरड्यातून बाहेर काढतात.पुढे मर्सी मिशन मध्ये रिबेकाला वाढवलं जात आणी ती टीव्ही माध्यमातून नावारूपाला येते एक नवीन आयुष्य सुरु होताच  एक एजंट तिला फसवतो आणी त्याच्या मार्फत काम करण्याच अरेंजमेंट  तिच्या कडून करून घेतो त्यामुळे पुढे तिला सी ग्रेड सिनेमात काम कराव लागत आणी करायला ही लावतो आणि या वाईट स्थितीतून  डेव्हिड नावाचे पात्र बाहेर काढत तिची सुटका करत पुढे डेव्हीड चा एक्सिडंट होतो…आणि  तिच्या आयुष्यात टॉनी नावाचा एक फोटोग्राफर येतो आता आयुष्याची नवी सुरुवात होते पद्द्मिनी आणी रिबेका यांची नवी सुरुवात मामी साठी फार आनंदाची गोष्ट असते पण  भूतकालीन काही वाईट गोष्टी आठवताच म्हणजे त्यांच्या लग्नाची पहिली रात्र आठवताच त्या वेड्यासारखे करू लागता आणी त्यांना परत मेंटल हॉस्पिटल मध्ये दाखल कराव लागत .

ही या नाटकातील तीन स्त्रियांची गोष्ट म्हणजे ‘माझा खेळ मांडू दे’हे सई परांजपे लिखीत नाटक.या तीनही स्त्रियांची गोष्ट शाररिक शोषणाशी रिलेट आहे आणी नाटकाचा काळ हा ४०,४५ वर्षापूर्वीचा आहे. सगळंच बदलतंय पण हे प्रश्न कालही होते आजच्या काळातही तसेच आहे कदाचित उद्याही तसेच राहतील यावर सोल्युशन सोल्युशनपर विचार मांडणार नाटक हव अस वाटत.

दिग्दर्शन –सुरेखा लाहामगे शर्मा यांनी नाटकाच दिग्दर्शन केलंय मुळात दिग्दर्शक हे स्वताहा स्त्री आहे आणी त्यांनी सादरीकरणासाठी निवडलेले नाटक ही एका महत्वाच्या स्त्री नाटककारणे लिहलय हे महत्वाच वाटत.
प्रकाश योजना – रवी राहाणे यांची प्रकाश योजना होती.
संगीत संयोजन – नंदू परदेशी यांनी केलेलं संगीत संयोजन नाटकाला साजेसे असे होते.
नेपथ्य – शैलेंद्र गौतम यांनी नेपथ्याची  छान मांडणी केली होती.
वेशभूषा – सई मोने पाटील यांनी केलेली वेशभूषा नाटकाच्या आशयाला अनुरूप अशी होती.
रंगभूषा -माणिक यांची यांची होती.
कलावंत – मामी ची भूमिका खूपच छान केलीये तृप्ती जेव्हेरीनेआपल्या पात्राला त्यांनी पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.
पद्द्मिनी रोल केलाय विशाखा धारणकर यांनी मनापासुन काम करण्याचा त्यांचा प्रयत्न स्तुत्य होता.रिबेकाची रोल करणाऱ्या रेवती आय्यर यांनी अप्रतिम काम केले स्टेज वरचा त्यांचा वावर खूप सहज होता हे सर्वच कलावंत तसे नवीन आणी प्रथमच ते स्टेजवर काम करत होते पण त्यांचा आत्मविश्वास  स्टेजवर काम करताना जाणवत होता या तिघांनीही छान काम करण्याचा खूप सुंदर प्रयत्न केलाय.

‘माझा खेळ मांडू दे ‘निर्मिती सूत्रधार -प्रवीण अलई
लेखक – सई परांजपे
दिग्दर्शक  सुरेखा लाहामगे शर्मा

प्रकाश – रवी राहणे
संगीत – नंदू परदेशी
नेपथ्य – शैलेंद्र गौतम
वेशभूषा – सई मोने पाटील
रंगभूषा – माणिक कानडे
कलावंत – यशवंत भालेराव,जोत्स्ना सोनवणे,विशाखा धारणकर,तृप्ती जेव्हेरी,रेवती आय्यर.
सहकार्य – श्रीकांत बेणी.

प्रवीण यशवंत.
मोबाईल – ७७६७८९४३५

प्रवीण यशवंत

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!