१७ वर्षांनंतर मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व आरोपी निर्दोष मुक्तता
साध्वी प्रज्ञा यांच्यासह सात आरोपी निर्दोष मुक्तता
📍 मुंबई/नाशिक | ३१ जुलै २०२५ – Malegaon Bomb Blast Case २००८ मध्ये मालेगावमध्ये घडलेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात तब्बल १७ वर्षांनंतर एनआयएच्या विशेष न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. भाजप नेत्या आणि माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, ले. कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांच्यासह सर्व सात आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले आहे.या निकालामुळे एक दीर्घकाळ सुरू असलेले आणि वादग्रस्त ठरलेले प्रकरण आता एका निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहे.
📌 स्फोटाची पार्श्वभूमी
२९ सप्टेंबर २००८ रोजी, मालेगावच्या भिक्कू चौक परिसरात रात्री एक स्फोट झाला. या स्फोटात ६ लोकांचा मृत्यू झाला, तर १०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले. स्फोटानंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. सुरुवातीला या प्रकरणाची चौकशी महाराष्ट्र ATS ने सुरू केली.
🕵️♀️ तपास आणि ‘भगवा दहशतवाद’ संज्ञेचा उदय
या प्रकरणाच्या तपासात हिंदू संघटनांशी संबंधित व्यक्तींची अटक झाली आणि यामुळे देशभरात “भगवा दहशतवाद” ही नवीच संज्ञा चर्चेत आली. अटक झालेल्यांमध्ये साध्वी प्रज्ञा, ले. कर्नल पुरोहित, सेवानिवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी यांचा समावेश होता.
⚖️ न्यायालयाचा निर्णय आणि निरीक्षण
३१ जुलै २०२५ रोजी एनआयएच्या विशेष न्यायालयाने निकाल देताना म्हटलं की:
स्फोट घडल्याचे आणि त्यात मृत्यू व जखमी झाल्याचे पुरावे मजबूत आहेत.
मात्र स्फोटासाठी वापरण्यात आलेली मोटारसायकल प्रज्ञा सिंह ठाकूर यांचीच होती, हे सिद्ध होऊ शकले नाही.
आरडीएक्स वापरल्याचा ठोस पुरावा देखील सरकारकडून सादर केला गेला नाही.
UAPA अंतर्गत लावलेले आरोप देखील न्यायालयात टिकले नाहीत.
न्यायालयाने स्पष्ट केले की, फायनान्शियल ट्रांजेक्शन किंवा संस्था पुरवलेला निधी स्फोटासाठी वापरला गेला होता, हे सिद्ध झाले नाही.
📅 संपूर्ण तपासाची टाइमलाइन (Malegaon Bomb Blast Case)
29 सप्टेंबर 2008: मालेगाव स्फोट, 6 मृत, 100+ जखमी
ऑक्टोबर 2008: साध्वी प्रज्ञा यांना अटक
जानेवारी 2009: ATS कडून पहिलं आरोपपत्र
2011: प्रकरण NIA कडे वर्ग
2016: NIA कडून पूरक आरोपपत्र दाखल
2018: 7 आरोपींवर औपचारिक आरोप निश्चित
2018–2023: 323 साक्षीदार तपासले; त्यात 40 पलटले
एप्रिल 2025: अंतिम युक्तिवाद पूर्ण
31 जुलै 2025: न्यायालयाचा निकाल – सर्व आरोपी निर्दोष
🕵️♀️ ‘भगवा दहशतवाद‘ हे वादग्रस्त संज्ञा याच प्रकरणातून समोर
या प्रकरणात तपासादरम्यान काही हिंदू संघटनांशी संबंधित व्यक्तींना अटक करण्यात आली, ज्यामुळे “भगवा दहशतवाद” ही संज्ञा चर्चेत आली. यामध्ये साध्वी प्रज्ञा, ले. कर्नल श्रीकांत पुरोहित, आणि इतरांचा समावेश होता.
🧑⚖️ न्यायालयात भावनिक क्षण
निर्णय ऐकल्यानंतर न्यायालयात आरोपींच्या नजरेत अश्रू होते. समीर कुलकर्णी यांनी “आमचा पुनर्जन्म झाला आहे” असं म्हटलं. त्यांनी पुढे सांगितलं, “१७ वर्षे आम्ही एक मानसिक, सामाजिक आणि आर्थिक त्रास सहन केला. आजचा दिवस आमच्यासाठी नवजीवन आहे.”
🗨️ साध्वी प्रज्ञा यांची प्रतिक्रिया
निर्णयानंतर साध्वी प्रज्ञा म्हणाल्या,
“मी १७ वर्ष दररोज मरण अनुभवत होते. मला माझ्याच देशात आतंकवादी ठरवलं गेलं. मी संन्यासी असल्यामुळेच जिवंत आहे. आजचा दिवस माझ्यासाठी न्याय मिळाल्याचा आहे. हिंदुत्व आणि भगव्याचा विजय झाला आहे.
निकालानंतर आरोपीच्या पिंजऱ्यात असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर भावूक झाल्या. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या, “मी माणुसकीचं नातं आणि न्यायव्यवस्थेचा सन्मान ठेवून इथे आले होते. पण माझं आयुष्य उध्वस्त करण्यात आलं. 13 दिवस मला अमानुष टॉर्चर करण्यात आलं. 17 वर्षे मी अपमान सहन केला. स्वतःच्याच देशात मला आतंकवादी ठरवण्यात आलं. ज्यांनी मला या अवस्थेत आणलं, त्यांच्या विषयी मी काही बोलणार नाही. संन्यासी असूनही मी सतत मरण अनुभवत होते. देवाला कलंकित करण्यात आले. माझं म्हणणं ऐकल्याबद्दल, मला समजून घेतल्याबद्दल मी न्यायालयाची मनापासून आभारी आहे,” असे त्या म्हणाल्या
⚠️ समाजात दोन टोकांच्या भावना
या निर्णयावरून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे, तर काहींनी न्याय प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. या प्रकरणामुळे दहशतवादाच्या चौकशीच्या प्रक्रियेतील त्रुटी, साक्षीदारांच्या साक्ष पलटण्याचे प्रकार आणि पुराव्यांची कमतरता पुन्हा चर्चेत आली आहे.
⚖️ आजच्या निर्णयात काय म्हटलं गेलं?
विशेष न्यायालयाचे न्यायमूर्तींनी निकाल वाचताना स्पष्ट केले की, स्फोट झाल्याचे पुरावे मजबूत आहेत, पण “स्फोट घडवून आणणाऱ्या मोटारसायकलमध्येच बॉम्ब होता” हे पुराव्याअभावी सिद्ध होऊ शकले नाही.त्याचबरोबर न्यायालयाने वैद्यकीय कागदपत्रांमध्ये हेराफेरी झाल्याचा उल्लेख करत, घायाळांची वयाची माहिती चुकीची असल्याचेही सांगितले.
📢 ताज्या बातम्या, न्यायालयीन निकाल आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित घडामोडींसाठी आमच्याशी जोडलेले राहा.
[…] १७ वर्षांनंतर मालेगाव बॉम्बस्फोटाती… […]