मुंबईला निघालेल्या मनोज जरांगेचा अंतरवाली सराटी कडे यूटर्न

संचार बंदी उठल्यानंतर मुंबईला जाणार : मराठा बांधवानी शांतता राखावी असे केले आवाहान

0

जालना,दि,२६ फेब्रुवारी २०२४ –मराठा आरक्षणासाठी गेल्या १७ दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange)यांनी काल रविवारी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत सागर बंगल्यावर येत असल्याचे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच केली होती. मात्र अंबड तालुक्यात मध्यरात्री १ वाजल्यापासून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संचारबदी लागू केल्या मुळे आता पुन्हा मनोज जरांगे पाटील पुन्हा मागे फिरले आहेत.अंतरवली सराटीमध्ये जाऊन आपण निर्णय घेणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस माझं एन्काऊंटर करण्याचा विचार करत आहेत, असा गंभीर आरोप जरांगे यांनी केला. यानंतर आपण सागर बंगल्यावर येत असल्याचे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच केली होती.

मनोज जरांगे पाटील यांचे दोन जवळचे शिलेदार शैलेंद्र पवार आणि बाळासाहेब इंगळे यांना आज पहाटे ४ वाजता ताब्यात घेण्यात आले आहे.याचा विरोध म्हणून घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथे बस जाळण्यात आली आहे. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा अंतरवलीत जाण्याचा निर्णय घेतला.मनोज जरांगे पाटील यांनी रात्री भांबेरी गावात तळ ठोकला होता.त्यानंतर भांबेरी गावात पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा अंतरवली सरावटीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.आपल्याला विचार करुन पुढचे पाऊल टाकावं लागणार आहे,” असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

सायंकाळी ५ वाजता उपोषणाच्या बाबत निर्णय घेणार
आज सायंकाळी ५ वाजता माझ्या आमरण उपोषणाच्या बाबत गावकऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेणार आहे.आज पासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणार आहे त्या मध्ये सग्यासोयऱ्यां बाबत निर्णय घेऊन अंमलबजावणी करावी असे ही जरांगे म्हणाले

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.