जालना,दि,३ नोव्हेंबर २०२४ – येत्या २३ नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होत आहे. निवडणुकीत अनेक पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तसंच काही संघटनादेखील यंदा आपले उमेदवार रिंगणात उतरवत आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे देखील आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवत आहेत. अशातच आज जालन्यातील अंतरवली सराटीत महत्त्वाची बैठक होणार आहे. ज्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. त्यांना मनोज जरांगेंनी अंतरवलीत बोलावलं आहे. या उमेदवारांशी संवाद साधणार आहेत. कोण उमेदवार असेल? याबाबत मनोज जरांगे पाटील आज निर्णय घेणार आहेत. आज संध्याकाळी ५ वाजता उमेदवार आणि मतदारसंघ याबाबत ते घोषणा घोषणा करणार आहेत.
ज्या मतदारसंघात ज्याला वाटतं की आपण निवडणूक लढवली पाहिजे, अशा लोकांनी अर्ज भरा. ऐनवेळी आपण ठरवू की उमेदवार कोण असेल ते ज्याला मी सांगेन त्याने अर्ज मागे घ्यायचा. पण जर मी सांगूनही एखाद्याने अर्ज मागे घेतला नाही तर तो आपला नाही. त्याला मदत करणार नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी याआधीच सांगितलं होतं. त्यानुसार मराठा बांधवांनी आपले उमेदवारी अर्ज भरले आहेत. आता त्यापैकी कोण अधिकृत उमेदवार असेल आणि कुणी अर्ज मागे घ्यायचा. हे मनोज जरांगे आज ठरवणार आहेत. कोणत्या मतदारसंघात कोण उमेदवार असणार,
मनोज जरांगे पाटलांनी सर्व उमेदवारांना आज अंतरवाली सराटीत बोलावलं आहे. मराठा मुस्लिम मागासवर्गीय यांचं समीकरण तयार करून निवडणुकीत उमेदवार उभे केले गेले आहेत. आज मनोज जरांगे उमेदवारी घोषित करणार आहेत. कुठं उमेदवार देणार कुठे माघार घेणार हे आज ठरणार आहे.