
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
फाल्गुन शुक्ल चतुर्दशी/पौर्णिमा. शिशिर ऋतू.विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८२.
राहू काळ – सकाळी ७.३० ते ९.००
चंद्र नक्षत्र – आश्लेषा/ (सकाळी ७.५२ पर्यंत) नंतर मघा.
राशी – कर्क (सकाळी ७.५२ पर्यंत) नंतर सिंह.
(अतिगंड योग. विष्टी करण. नक्षत्र गंडांत शांती) *हुताशनी पौर्णिमा – होळी.*
चंद्र प्रतियुती मंगल, चंद्र केंद्र हर्षल.
२ मार्च रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-(Marathi Rashi Bhavishya)
तुमच्यावर गुरू आणि चंद्राचा प्रभाव आहे. तुम्ही ध्येयवादी असून तुमच्या चांगली कल्पनाशक्ती आहे. तुम्ही इतरांचे ऐकून घेतात मात्र स्वतःच्या मनाप्रमाणे करतात. इतरांच्या भावनांची तुम्ही कदर करतात. चांगले आणि वाईट यात तुम्ही फरक करू शकतात. तुमचे ध्येय काय आहे याची तुम्हाला स्पष्ट कल्पना असते. आळशीपणा तुम्हाला आवडत नाही. कामात टापटीप असते. दूरच्या प्रवासाची आवड असते. तुम्ही इतरांना सहजपणे आकर्षित करतात. धर्मबद्दल ओढ आहे मात्र कर्मकांडवर विश्वास नाही. निसर्गाबद्दल प्रेम आहे. समुद्र आणि खगोल यांची आवड असते. वयाच्या २९ नंतर उत्कर्ष होतो. इतरांना मदत करणे आवडते. सहानुभूती वाटते. मोठमोठे प्रकल्प हाती घेऊन तुम्ही ते पूर्णत्वास नेतात.
व्यवसाय:- संगीतकार, कथा लेखक, कादंबरी लेखन, टीव्ही सिरीयल लेखन, प्राध्यापक, वक्ते, केमिस्ट, रसायन संबंधित, दागिने संबंधित, प्रयोग शाळा, द्रव पदार्थ संबंधित, दंतरोग तज्ञ.
शुभ रंग – पांढरा, बदामी, जांभळा.
“आज उत्साह आणि सावधगिरी यांचा संगम असलेला दिवस आहे.”
मेष:-चंद्र पंचम स्थानात संचार करतो. कार्यक्षेत्रात स्पर्धा वाढेल. परंतु तुमच्या धैर्यामुळे यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.
वृषभ:-चतुर्थ चंद्र घरात आनंद निर्माण करेल. संततीकडून सुखवार्ता मिळेल. एखादी नवीन योजना आखाल.
मिथुन:-तृतीय चंद्र प्रवासाचे योग देतो. कुटुंबातील मतभेद मिटतील. वाहन जपून चालवा.
कर्क:-राशीतून द्वितीयस्थानी चंद्र प्रवेश करेल. सकाळपर्यंत भावनिकता जास्त असेल. नंतर आर्थिक लाभाचे संकेत आहेत. बोलण्यात संयम ठेवा.
सिंह:-सकाळनंतर चंद्र तुमच्या राशीत येईल. आत्मविश्वास वाढेल. प्रतिष्ठा आणि मान-सन्मान मिळेल. नवीन कार्यारंभासाठी उत्तम वेळ.
कन्या:-द्वादश/लग्नपूर्व चंद्र खर्च वाढवेल. आध्यात्मिक कार्यात मन लागेल. होळीच्या निमित्ताने कुटुंबात उत्साह असेल.
तुळ:-लाभस्थानी चंद्र आहे. मित्रपरिवारासोबत आनंद साजरा कराल. आर्थिक प्रगतीचे संकेत आहेत.
वृश्चिक:-दशम चंद्र करिअरमध्ये प्रगती देईल. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. परंतु उतावळेपणा टाळा.
धनु:-भाग्यस्थानी चंद्र शुभ आहे. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. प्रवासाचा योग आहे.
मकर:-अष्टम चंद्र सावधगिरी सुचवतो. आरोग्याकडे लक्ष द्या. अनपेक्षित खर्च संभवतो.
कुंभ:-सप्तम चंद्र दाम्पत्य जीवनात आनंद देईल. भागीदारीत लाभ होईल. होळीच्या सणात आनंदी वातावरण.
मीन:-षष्ठ चंद्र कामाचा ताण वाढवेल. स्पर्धेत यश मिळेल. संयम आणि शिस्त पाळा.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. .ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521)


