आजचे राशिभविष्य गुरुवार,१९ मार्च २०२६

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
फाल्गुन अमावस्या / चैत्र शुक्ल प्रतिपदा. वसंत ऋतू. शके १९४८, संवत २०८२. पराभवनाम संवत्सर.
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
आज शुभ दिवस आहे. आज *गुढी पाडवा* (सकाळी ६.५४ नंतर गुढी उभारावी). अभ्यंग स्नान करावे, कडुनिंबाचे चूर्ण सेवन करावे.
चंद्रनक्षत्र – उत्तरा भाद्रपदा. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मीन.(Marathi Rashi Bhavishya)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) व्यय स्थानी चंद्र आहे मात्र रवी-चंद्र युतीमुळे आत्मविश्वास वाढेल. नवीन कामांची सुरुवात करणे लाभदायक ठरेल. सणाचा आनंद द्विगुणित होईल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आर्थिक लाभाचे योग आहेत. घरात आनंदाचे वातावरण राहील. गुढी पाडव्याच्या निमित्ताने नवीन खरेदी होईल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) चंद्र-शनी युतीमुळे थोडा मानसिक ताण जाणवेल. महत्वाचे निर्णय पुढे ढकला. धार्मिक कार्यात मन लागेल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) मन प्रसन्न राहील. कुटुंबासोबत सण साजरा कराल. आरोग्य उत्तम राहील. घरात शुभकार्याचे संकेत आहेत.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अष्टम स्थानी चंद्र आहे. रवीचा प्रभाव वाढल्याने मान-सन्मान मिळेल. कामात प्रगती होईल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल.
कन्या:– (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) खर्च वाढण्याची शक्यता आहे. तरीही आनंदी वातावरण राहील. प्रवासाचे योग संभवतात.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) चंद्र-नेपच्यून युतीमुळे गोंधळ निर्माण होऊ शकतो. निर्णय घेताना काळजी घ्या. सर्जनशील कामात यश मिळेल.
वृश्चिक:– (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अनुकूल ग्रहमान आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील. सणामुळे उत्साह वाढेल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) नोकरीत व व्यवसायात चांगल्या संधी मिळतील. प्रवासाचे योग आहेत. नवीन योजना आखाल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) भाग्याची साथ मिळेल. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. परदेशाशी संबंधित कामे मार्गी लागतील.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) द्वितीय चंद्रामुळे थोडी अनुकूलता जाणवेल. मात्र आरोग्याची काळजी घ्या. खर्च वाढेल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) चंद्र आपल्या राशीत असल्याने मन प्रसन्न राहील. सणाचा आनंद घ्याल. नवीन सुरुवातीसाठी उत्तम दिवस.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – .ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521)

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!