आजचे राशिभविष्य गुरुवार, ११ डिसेंबर २०२५

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 

2

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक  (Marathi Rashi Bhavishya)

मार्गशीर्ष कृष्ण सप्तमी/अष्टमी. विश्कुंभ योग.

पूर्वा फाल्गुनी नक्षत्र. चंद्र सिंह राशीत  रवी केंद्र चंद्र. चंद्र केंद्र शुक्र. दक्षिणायन.

हेमंत ऋतू.

राहुकाळ – दुपारी १:३० ते ३

आजचा दिवस चंद्र सिंह राशीत असल्याने व्यक्तिमत्व, आत्मविश्वास, नेतृत्व आणि भावनिक उर्जा उच्च राहील. पूर्वा फाल्गुनी नक्षत्र सर्जनशीलता, आनंद, संबंध आणि आकर्षण वाढवते.विश्कुंभ योग काही ठिकाणी मानसिक दडपण देऊ शकतो, पण रचना आणि योग्य नियोजनाने कामे पार पडतील.(Marathi Rashi Bhavishya)

मेष (Aries)कामात अचानक वाढणारी जबाबदारी तुम्हाला पुढे नेईल. आर्थिक स्थिती सुधारेल. प्रेमसंबंधात आनंदाचे क्षण. आरोग्य सामान्य पण अति थकवा टाळा.

वृषभ (Taurus)घरगुती निर्णयांसाठी योग्य दिवस. प्रवास किंवा स्थावर मालमत्तेचे विषय अनुकूल. जोडीदाराकडून चांगला पाठिंबा. पैशांच्या बाबतीत सावध राहा.

मिथुन (Gemini)-संवाद कौशल्य झळकून दिसेल. नवीन संपर्क उपयुक्त ठरतील. कोर्ट-कचेरीची कामे पुढे सरकतील. आरोग्यात ताण-तणावावर नियंत्रण आवश्यक.

कर्क (Cancer)खर्च वाढण्याची शक्यता. परंतु चंद्रशुक्र केंद्र प्रभावामुळे नवे उत्पन्न साधन मिळू शकते. कुटुंबात आनंदाचे वातावरण. आहारावर लक्ष द्या.

सिंह (Leo)-आज चंद्र आपल्या राशीत. आत्मविश्वास, प्रतिष्ठा व प्रभाव वाढेल. महत्त्वाचे निर्णय घ्यायला योग्य वेळ. नोकरीत सन्मान. प्रेमसंबंधात रोमँटिकता.

कन्या (Virgo)-मन अस्थिर होण्याची शक्यता. विश्कुंभ योगामुळे काही अडथळे येतील, पण प्रयत्न सोडू नका. आर्थिक बचतीवर भर द्या. आरोग्यात थोडे चढउतार.

तुला (Libra)-चंद्रशुक्र केंद्र योग तुमच्यासाठी अतिशय शुभ. आर्थिक लाभ, सौंदर्य/कला क्षेत्रात प्रगती. सामाजिक मान वाढेल. प्रेमसंबंधासाठी उत्तम दिवस.

वृश्चिक (Scorpio)-कामात स्पर्धा वाढेल पण तुम्ही वरचढ ठराल. घरातील ज्येष्ठांकडून मार्गदर्शन मिळेल. गुंतवणुकीसाठी विचारपूर्वक पाऊल उचला.

धनु (Sagittarius)-विद्यार्थ्यांना विशेष यश. परदेशी संधी, प्रवास किंवा उच्च शिक्षणाशी संबंधित कामे अनुकूल. नातेसंबंधात थोडे मतभेद संभवतात.

मकर (Capricorn)आर्थिक दृष्ट्या मिळते-जुळते राहील. कर्ज विषयात हलकीशी दिलासा. कामातील सातत्य ठेवा. आरोग्य सुधारेल. जोडीदाराकडून प्रोत्साहन.

कुंभ (Aquarius)भागीदारी, करार, विवाह किंवा नाते यात सकारात्मक घडामोडी. चंद्रशुक्र केंद्र प्रभावामुळे आकर्षण व संवादात गोडवा. नवीन काम सुरू करण्यास योग्य दिवस.

मीन (Pisces)-कामात मेहनत जास्त घ्यावी लागेल पण निकाल समाधानकारक. शारीरिक थकवा जाणवेल. आर्थिक बाबींत स्थैर्य. कुटुंबाशी संवाद वाढवा.

.(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव‘ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

2 Comments
  1. […] राहू काळ: दुपारी १२.०० ते १.३०   […]

Don`t copy text!