आजचे राशिभविष्य बुधवार, २५ मार्च २०२६

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक  (Marathi Rashi Bhavishya Today)
चैत्र शुक्ल सप्तमी   पराभव
नाम संवत्सर – शके १९४८ – संवत २०८२  चंद्र – मिथुन राशीत  नक्षत्र – मृग / (संध्याकाळी ५.३४ नंतर) आर्द्रा
राहुकाळ – दुपारी १२.०० ते १.३०
दिशाशूल – पश्चिम दिशा
शुभ रंग – हिरवा, पिवळा, निळा
शुभ अंक – ५, २, ६ (Marathi Rashi Bhavishya Today)
आज दुपारी २.०० पर्यंत चांगला दिवस आहे.रवी केंद्र चंद्र, रवी युती शनी, चंद्र केंद्र शनी, चंद्र केंद्र नेपच्यून.  सूर्याला दवणा वाहणे शुभ.

मेष (Aries)-सकाळचा वेळ अनुकूल आहे. कामे वेळेत पूर्ण होतील. दुपारनंतर संयम ठेवणे गरजेचे.  उपाय: सूर्याला दवणा अर्पण करा व आदित्य मंत्र जपा.
वृषभ (Taurus)-आर्थिक बाबतीत लाभ होईल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. दुपारनंतर खर्च वाढू शकतो.  उपाय: लक्ष्मी पूजन करा व पांढरी फुले अर्पण करा.
मिथुन (Gemini)-तुमच्या राशीत चंद्र आहे. आत्मविश्वास वाढेल. नवीन संधी मिळतील. दुपारनंतर मानसिक ताण जाणवू शकतो.  उपाय: गणपतीची पूजा करून दूर्वा अर्पण करा.
कर्क (Cancer)-मन थोडे अस्थिर राहू शकते. गुप्त चिंता वाढू शकते. ध्यान-धारणा उपयुक्त ठरेल.  उपाय: शिवलिंगावर जल व बिल्वपत्र अर्पण करा.
सिंह (Leo)-मित्रांकडून सहकार्य मिळेल. आर्थिक लाभाचे योग. दुपारनंतर संभ्रम वाढू शकतो.  उपाय: सूर्याला अर्घ्य द्या व रामनाम जपा.
कन्या (Virgo)-कार्यस्थळी यश मिळेल. वरिष्ठांची कृपा राहील. दुपारनंतर कामात अडथळे येऊ शकतात.  उपाय: हिरव्या मूग डाळीचे दान करा.
तुळ (Libra)-भाग्याची साथ मिळेल. प्रवास लाभदायक. धार्मिक कार्यात रुची वाढेल.  उपाय: विष्णूला पिवळे फुल अर्पण करा.
वृश्चिक (Scorpio)-संमिश्र दिवस आहे. आरोग्याची काळजी घ्या. अचानक बदल संभवतात.  उपाय: हनुमानाला सिंदूर अर्पण करा.
धनु (Sagittarius)-संबंधांमध्ये गोडवा राहील. जोडीदाराची साथ मिळेल. दुपारनंतर गैरसमज टाळा.  उपाय: केशर तिलक लावा व विष्णू पूजन करा.
मकर (Capricorn)-कामात व्यस्त राहाल. मेहनतीचे फळ मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.  उपाय: शनिदेवाला काळे तीळ अर्पण करा.
कुंभ (Aquarius)-सर्जनशील कामात यश मिळेल. मुलांकडून आनंद मिळेल. प्रेमसंबंध दृढ होतील.  उपाय: गणपतीला दूर्वा अर्पण करा.
मीन (Pisces)-घरगुती वातावरणात बदल होतील. आई-वडिलांची साथ मिळेल. मानसिक शांतता राखा.  उपाय: विष्णूला तुळशीपत्र अर्पण करा.

आजचा शुभ विचार:
“विचारांची दिशा योग्य असेल, तर परिस्थिती कितीही कठीण असली तरी मार्ग सापडतो.”

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – .ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521)

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!