आजचे राशिभविष्य मंगळवार, ३१ मार्च २०२६

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक(Marathi Rashi Bhavishya Today)
चैत्र शुक्ल त्रयोदशी/चतुर्दशी. वसंत ऋतू. पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
आज चांगला दिवस आहे. *भगवान महावीर जयंती*, महादेवाला दवणा वाहणे.
चंद्र नक्षत्र – पूर्वा / (दुपारी ३.२१ नंतर) उत्तरा
आज जन्मलेल्या बाळाची राशी – सिंह / (रात्री ९.३३ नंतर) कन्या.(Marathi Rashi Bhavishya Today)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ)- चंद्र-मंगळ प्रतियुतीमुळे उत्साह वाढेल. धाडसी निर्णय घ्याल. मात्र रागावर नियंत्रण ठेवा. कामाचा ताण जाणवेल.
वृषभ:-(इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो)-आर्थिक लाभाचे संकेत आहेत. नवीन वस्तू खरेदी कराल. प्रतिष्ठा वाढेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
मिथुन:-(का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा)-घरात बदल आणि सजावट कराल. नवीन योजना यशस्वी होतील. मात्र आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो)-धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. धाडसी निर्णय यशस्वी ठरतील. कुटुंबाचा पाठिंबा मिळेल.
सिंह:-(मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे)-चंद्र राशीत असल्याने आत्मविश्वास वाढेल. मात्र मंगळामुळे अस्थिरता येऊ शकते. संयम ठेवा.
कन्या:-(टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो)-रात्रीनंतर चंद्र राशीत येईल. बुद्धिमत्तेचा उत्तम उपयोग कराल. कामात प्रगती होईल. सहकार्य कमी मिळेल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते)-मन अस्वस्थ राहील. काही गोष्टींची चिंता वाढेल. उपासना आणि ध्यान उपयुक्त ठरेल.
वृश्चिक:-(तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु)-खर्च वाढेल. प्रतिष्ठेसाठी खर्च करावा लागू शकतो. रागामुळे नुकसान टाळा.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे)-कामाचा ताण वाढेल. वरिष्ठांचा दबाव जाणवेल. संयमाने काम केल्यास यश मिळेल.
मकर:-(भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी)-मानसिक ताण वाढेल. प्रवासात बदल होईल. आरोग्याकडे लक्ष द्या.
कुंभ:-(गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा)-अष्टम चंद्रामुळे मन अस्थिर राहील. संततीबाबत चिंता वाटेल. निर्णय विचारपूर्वक घ्या.
मीन:-(दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची)-घर आणि कुटुंबावर लक्ष द्यावे लागेल. जोडीदाराचा सल्ला उपयोगी ठरेल. काही कामे पुढे ढकलावी लागतील.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव‘ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – .ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521)

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!