आजचे राशिभविष्य –बुधवार,२ जुलै २०२५
२ जुलै रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये
✍️ ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक Marathi Rashi Bhavishya Today
🌧️ आषाढ शुक्ल सप्तमी/अष्टमी | वर्षा ऋतू | नक्षत्र – उत्तरा (फाल्गुनी)
🕛 राहुकाळ – दुपारी १२.०० ते १.३०
📌 बुधाष्टमी विशेष – इलेक्ट्रॉनिक्स, संगणक आणि दळणवळण क्षेत्रात सावधगिरी आवश्यक. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक टाळा.
🔮 आज जन्मलेल्या बाळाची राशी – कन्या. (वरीया योग आणि विष्टी करण शांती)
🔮 राशीभविष्य (Marathi Rashi Bhavishya Today)
♈ मेष (ARIES):
स्वतःच्या आनंदासाठी खर्च, आर्थिक आवक, पाळीव प्राण्यांविषयी प्रेम.
📝 टिप: नात्यात गैरसमज टाळण्यासाठी संवाद स्पष्ट ठेवा.
♉ वृषभ (TAURUS):
कलाकार, लेखक यांना लाभदायक काळ. मन प्रसन्न राहील.
📝 टिप: कर्ज आणि उधारीच्या बाबतीत सावध रहा.
♊ मिथुन (GEMINI):
उत्साह वाढेल, सरकारी कामात प्रगती.
📝 टिप: अपेक्षा कमी ठेवा, धार्मिक कामांमध्ये मन लावण्याचा प्रयत्न करा.
♋ कर्क (CANCER):
आर्थिक स्थिती मजबूत, मनासारखा व्यवसाय, बुद्धीची चमक.
📝 टिप: इतरांच्या अडचणीत मदत कराल, परंतु सीमारेषा ठेवा.
♌ सिंह (LEO):
स्वतंत्र काम, अधिकारवाढ, वाहन खरेदीची शक्यता.
📝 टिप: टीमवर्कसाठी तुमच्या गोड बोलण्याचा वापर करा.
♍ कन्या (VIRGO):
व्यवसायात प्रगती, अर्थकारण मजबूत, खरेदीची शक्यता.
📝 टिप: निर्णय घ्यायला वेळ न घालवता पुढाकार घ्या.
♎ तुळ (LIBRA):
कौशल्याचे कौतुक, आर्थिक बाजू सुधारेल.
📝 टिप: विनाकारण वादविवादात पडू नका. संयम आवश्यक.
♏ वृश्चिक (SCORPIO):
महत्त्वाची कामे पूर्ण, प्रवास, शिक्षणात प्रगती.
📝 टिप: अनैतिक कामांपासून दूर राहा. तंत्रज्ञान योग्य वापरा.
♐ धनु (SAGITTARIUS):
भूमी व्यवहार लाभदायक, निर्णयांत स्थिरता हवी.
📝 टिप: भागीदारी टाळा, कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी सतर्क रहा.
♑ मकर (CAPRICORN):
तीर्थयात्रा, आर्थिक लाभ, वृद्धांची सेवा करा.
📝 टिप: जुगार, सट्टा टाळा. साधना आणि संयमाने काम करा.
♒ कुंभ (AQUARIUS):
नियोजनात बदल, कौटुंबिक सौख्य, सायबर सुरक्षेची गरज.
📝 टिप: जुन्या कामात नवीन संधी शोधा. डिव्हाइस अपडेट ठेवा.
♓ मीन (PISCES):
कलात्मक यश, धार्मिक कार्यात सहभाग.
📝 टिप: फसवणुकीपासून सावध रहा. वाहन चालवताना दक्षता घ्या.
२ जुलै रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये
तुमच्यावर चंद्र आणि नेपच्यून या दोन ग्रहांचा प्रभाव आहे. जीवनामध्ये तुम्हास जे काय मिळवायचे असते त्याबद्दल तुम्ही मोठ मोठे स्वप्न रंगवत असतात. तुमच्या प्रत्येक कामाबद्दल तुम्ही उत्साही असतात आणि इतरांनी देखील आपले अनुकरण करावे असे तुम्हाला सतत वाटत असते. तुम्हाला प्रसिद्धीच्या झोतात राहणे आवडते. तुमच्यात नेतृत्व गुण आहेत. एकच गोष्ट सतत करणे तुम्हाला आवडत नाही. तुम्हाला नाविन्याची आवड आहे. व्यवहारिक जीवन चा दृष्टिकोन काहीसा अपुरा असतो. स्वतःच्या स्वप्नांमध्ये रंगायला तुम्हाला अधिक आवडते. तुमचे जीवन एककल्ली असते. तुमच्या वैचारिक पातळीमध्ये इतरांना तुम्ही स्थान देत नाहीत मात्र तुम्ही उदार असल्यामुळे इतरांना प्रिय असतात. लोकांना नाराज करणे तुम्हाला जमत नाही. इतराने तयार केलेल्या आराखड्याचे तुम्ही चांगल्या कामात रूपांतर करू शकतात. रम्य विषयांमध्ये, निसर्गामध्ये, समुद्र, आकाश यामध्ये रमणे तुम्हाला आवडते. आकाशाकडे, समुद्राच्या लाटांकडे तासनतास बघत बसण्यात तुमचा वेळ जातो. तुमचा स्वभाव काहीसा भित्रा असतो. तुम्ही मनातून अस्वस्थ असतात आणि सतत बदल करण्याचे वृत्ती असते.
व्यवसाय:- संगीतकार, कथालेखक, नेपथ्य, पेंटिंग्स, नाट्यकृती, कविता, करणे, द्रव पदार्थांचा व्यवसाय, केमिस्ट, प्रयोगशाळा, दंतरोगतज्ञ, सर्जरी.
शुभ दिवस:- सोमवार, गुरुवार.
शुभ रंग:- पांढरा, निळा, क्रीम.
शुभ रत्न:- मोती, हिरा, चंद्रमणी, गोमेद.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
📞 कुंडली परीक्षण, नामज्योतिष, रत्न सल्ला व वैयक्तिक मार्गदर्शनासाठी संपर्क:
🧙♂️ ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – नाशिक
📱 8087520521
