

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
पौष शुक्ल चतुर्दशी.विश्वावसुनाम संवत्सर.
शके १९४७, संवत २०८२.
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
“आज संध्याकाळी ७.०० पर्यंत चांगला दिवस आहे”
नक्षत्र – मृग / (रात्री ८.०४ नंतर) आर्द्रा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – वृषभ / (सकाळी ९.२६ नंतर) मिथुन. विष्टी करण शांती.
ग्रहयोग:
चंद्र प्रतियुती बुध, चंद्र केंद्र शनी, चंद्र केंद्र नेपच्यून
२ जानेवारी रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-(Marathi Rashi Bhavishya)
तुम्ही स्वप्नाळू, हळवे, मनमिळाऊ आहात. तुमच्या डोळ्यात टचकन पाणी येते. तुम्हाला चटकन निर्णय घेता येत नाहीत. समुद्राचा सहवास तुम्हाला आवडतो. भावनांच्या हिंदोळ्यावर तुम्ही झुलत असतात. तुम्हाला प्रवासाची आवडअसून दूरवर फिरणे पसंत करतात. तुम्ही बुद्धिमान, भिडस्त आणि उमद्या स्वभावाचे आहात. आकाशाची भव्यता आणि विशालता तुम्हाला भावते. मात्र कधीकधी तुम्हाला नैराश्य येते. चंद्राच्या प्रभावामुळे असे घडते. तुम्ही निराश आणि अस्वस्थ होणे टाळले पाहिजे.
व्यवसाय:- तत्वज्ञान, गूढ शास्त्र, कथालेखन, नाटक, रासायसन शास्त्र यात यश मिळते.
आरोग्य:- रक्तदाब, संधिवात, व्हेरिकोज व्हेन्स यापासून सावध रहा.
शुभ दिवस: सोमवार, मंगळवार, शुक्रवार.
शुभरंग:- पांढरा.
♈ मेष :- (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)–आज सकाळी कामे मार्गी लागतील. बुध-चंद्र प्रतियुतीमुळे संवादात गैरसमज होऊ शकतात, त्यामुळे शब्द जपून वापरा. संध्याकाळनंतर थोडा तणाव जाणवेल. खर्च नियंत्रणात ठेवा.
♉ वृषभ :- (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)–चंद्र तुमच्या राशीत असल्याने आत्मविश्वास वाढेल. नोकरी व व्यवसायात प्रगती दिसेल. खरेदीचे योग आहेत. संध्याकाळी ७ नंतर थकवा जाणवू शकतो.
♊ मिथुन :- (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)–चंद्र लवकरच तुमच्या राशीत प्रवेश करीत आहे. बुध प्रतियुतीमुळे विचारांची गती वाढेल, पण निर्णय घाईने घेऊ नका. लेखन, बोलणे, करार यासाठी दिवस अनुकूल आहे.
♋ कर्क :- (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)–मानसिक चढउतार जाणवतील. चंद्र केंद्र शनीमुळे जबाबदाऱ्या वाढतील. कुटुंबात शांतता राखण्याचा प्रयत्न करा. संध्याकाळनंतर विश्रांती घ्या.
♌ सिंह :- (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)–मित्रमंडळींकडून सहकार्य मिळेल. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. चंद्र केंद्र नेपच्यूनमुळे कल्पकतेला वाव मिळेल. संध्याकाळी निर्णय टाळावेत.
♍ कन्या :- (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)–नोकरीत जबाबदारी वाढेल. वरिष्ठांशी संवाद जपून ठेवा. चंद्र-बुध योगामुळे बौद्धिक कामात यश मिळेल. संध्याकाळनंतर तणाव कमी होईल.
♎ तुळ :- (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)–प्रवासाचे योग आहेत. धार्मिक किंवा आध्यात्मिक चर्चेत सहभाग घ्याल. आज संध्याकाळी ७ पर्यंत अनुकूलता राहील. त्यानंतर थोडी अस्वस्थता जाणवेल.
♏ वृश्चिक :- (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)–आर्थिक व्यवहारात सावधगिरी आवश्यक आहे. अचानक खर्च वाढू शकतो. चंद्र केंद्र शनीमुळे जुने प्रश्न पुन्हा समोर येतील. संयम ठेवा.
♐ धनु :- (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)–भागीदारी व्यवहारात लाभ होईल. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. दिवसाचा पूर्वार्ध शुभ आहे. संध्याकाळनंतर प्रकृतीकडे लक्ष द्या.
♑ मकर :- (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)–कामाचा ताण जाणवेल. आरोग्याची काळजी घ्या. चंद्र केंद्र शनीमुळे शिस्त आवश्यक आहे. संध्याकाळनंतर विश्रांती लाभेल.
♒ कुंभ :- (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)–संततीविषयक आनंद मिळेल. सर्जनशील कामात यश मिळेल. प्रेमसंबंध दृढ होतील. संध्याकाळनंतर खर्च वाढण्याची शक्यता आहे.
♓ मीन :- (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)–घरगुती बाबींकडे लक्ष द्यावे लागेल. वास्तू किंवा वाहन विषयक चर्चा होऊ शकते. चंद्र केंद्र नेपच्यूनमुळे भावनिकता वाढेल. संयम ठेवा.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – .ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521)



[…] आजचे राशिभविष्य शुक्रवार, २ जानेवारी … […]