
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
कार्तिक कृष्ण दशमी विश्वावसुनाम संवत्सर – शके १९४७ – संवत २०८१
चंद्र – सिंह राशीत.
आज वर्ज्य दिवस आहे. वैधरुती योग, विष्टी करण शांती.
नक्षत्र – उत्तरा फाल्गुनी नक्षत्र (दिवसभर)
राहुकाळ – सकाळी १०.३० ते १२.००
शुभ रंग – पांढरा, गुलाबी, रुपेरी
शुभ अंक – ६, २
विशेष: शुक्रवार – देवी लक्ष्मी व शुक्र ग्रह उपासनेसाठी शुभ दिवस. सौंदर्य, समृद्धी, प्रेम व कला यांचे प्रतीक.(Marathi Rashi Bhavishya)
मेष (Aries)कामात प्रगती होईल. आर्थिक स्थैर्य येईल. जोडीदाराशी संबंध अधिक दृढ होतील. उपाय: देवी लक्ष्मीला कमळफूल आणि खीर अर्पण करा.
वृषभ (Taurus)शुक्र तुमचा अधिपती ग्रह असल्याने दिवस अनुकूल. कार्यात यश मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. उपाय: पांढरे वस्त्र धारण करा व सुगंधी अत्तर वापरा.
मिथुन (Gemini)बुद्धिमत्तेने निर्णय घ्या. व्यापारात नवा करार लाभदायक ठरेल. घरात आनंदाचे वातावरण. उपाय: गणपतीला दूर्वा अर्पण करा आणि वेलची दान करा.
कर्क (Cancer)प्रेमसंबंधात गोडवा येईल. आर्थिक लाभाची शक्यता. आरोग्य उत्तम राहील. उपाय: चंद्राला पांढऱ्या तांदळाचा नैवेद्य अर्पण करा.
सिंह (Leo)चंद्र तुमच्या राशीत आहे. कार्यक्षेत्रात सन्मान मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. प्रवासातून लाभ संभवतो. उपाय: सूर्य व देवी लक्ष्मी यांची संयुक्त पूजा करा.
कन्या (Virgo)चंद्र तुमच्या व्यय स्थानात असल्याने आत्मविश्वास कमी होईल. काही निर्णय योग्य ठरतील. आरोग्य उत्तम राहील. मात्र कामे रेंगाळतील. उपाय: विष्णूला तुळशीपत्र अर्पण करा.
तुला (Libra)शुक्र तुमच्या राशीचा स्वामी असल्याने अत्यंत शुभ दिवस. सौंदर्य, कला व संगीत क्षेत्रात प्रगती. प्रेमजीवन आनंददायी. उपाय: देवी लक्ष्मीला गुलाबपुष्प व तूपाचा दीप अर्पण करा.
वृश्चिक (Scorpio)धनप्राप्तीचे योग. व्यवसायात यश. धार्मिक कृतीसाठी अनुकूल काळ. उपाय: हनुमानाला सिंदूर अर्पण करा.
धनु (Sagittarius)धार्मिक कार्यात रुची वाढेल. विद्यार्थ्यांना यश लाभेल. प्रवास फायदेशीर. उपाय: विष्णूला पिवळे फुल अर्पण करा.
मकर (Capricorn)नोकरीत नवीन संधी मिळतील. आरोग्य सुधारेल. आर्थिक स्थैर्य येईल. उपाय: शनिदेवाला काळे वस्त्र दान करा.
कुंभ (Aquarius)कौटुंबिक आनंद वाढेल. नवे करार फायदेशीर ठरतील. मानसिक शांती लाभेल. उपाय: तुलसीवृंदावनाला प्रदक्षिणा घाला.
मीन (Pisces)धार्मिक प्रवासाचे योग. प्रेमजीवन सुखकर. आर्थिक दृष्ट्या दिवस फलदायी. उपाय: भगवान विष्णूला खीर अर्पण करा आणि देवी लक्ष्मीचे नामस्मरण करा.
आजचा शुभ विचार:
“देवी लक्ष्मी कृपेने केवळ धन नव्हे, तर शांती, सौंदर्य आणि प्रेम यांचेही वरदान मिळते.”
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)



