
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
मार्गशीर्ष कृष्ण चतुर्थी / पंचमी
चंद्र – कर्क राशीत. पुष्य
नक्षत्र. योग – चंद्र त्रिकोण शुक्र, चंद्र त्रिकोण नेपच्यून. दक्षिणायन. हेमंत ऋतू .
शके १९४७ . संवत २०८२. आजचा दिवस अत्यंत शुभ.
राहू काळ: सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
आज चंद्र कर्क राशीत आणि पुष्य नक्षत्रात असल्याने समृद्धी, पोषण, कौटुंबिक आनंद, आर्थिक सुरक्षितता आणि मानसिक स्थैर्य मिळवून देणारा दिवस.
महत्त्वाची कामे राहू काळ टाळून करावीत.(Marathi Rashi Bhavishya)
मेष -घरगुती वातावरण आनंदी. आर्थिक स्थितीत सुधारणा. प्रेमसंबंधात गोडवा. अंतर्ज्ञान बलवान असेल. वाहन/प्रवास काळजीपूर्वक.
वृषभ -नवीन योजना यशस्वी होतील. लेखन, बोलणे, मीटिंग्स यासाठी उत्तम वेळ. भावंडांकडून मदत. संध्याकाळी आर्थिक लाभ.
मिथुन -पैसे येण्याचे मार्ग खुलतील. व्यवसायात नफा. कुटुंबात समाधान. स्वतःवर विश्वास वाढेल. राहू काळात निर्णय टाळा.
कर्क -आज तुमचा दिवस! भाग्यवृद्धी, आत्मविश्वास, नवे आरंभ. प्रेमात शुभ संकेत. आरोग्य उत्तम. नवीन कामांना अत्यंत अनुकूल वेळ.
सिंह -ध्यान, आध्यात्मिकता, अंतर्मुखता वाढेल. गुप्त लाभाची शक्यता. खर्चावर नियंत्रण ठेवा. दुपारी ताण कमी होईल.
कन्या -मित्र, नेटवर्किंग, सोशल सर्कलमधून लाभ. नवीन प्रकल्पांना शुभ सुरुवात. प्रेमात सकारात्मकता वाढेल.
तुळ -करिअरमध्ये प्रगती. वरिष्ठांचे सहकार्य. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. दुपारी एखादा लाभदायक प्रस्ताव येऊ शकतो.
वृश्चिक -परदेश, प्रवास, शिक्षणाशी संबंधित लाभ. भाग्य मजबूत. नवी शिकवण मिळेल. धार्मिक कामांसाठी शुभ दिवस.
धनु -अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता. भावनिक स्थैर्य. जोडीदाराशी नाते अधिक जुळले. संध्याकाळी आर्थिक सुधारणा.
मकर -भागीदारीत फायदा. दाम्पत्य जीवन गोड. दिवसाच्या दुसऱ्या भागात विशेष शुभयोग. कोर्ट-कचेरीत अनुकूलता.
कुंभ -कामात गती. आरोग्य चांगले. दैनंदिन कामे सहज पार पडतील. सहकाऱ्यांकडून मदत. आर्थिक स्थिरता वाढेल.
मीन -सर्जनशीलता, कला, प्रेम, मुले याबाबत अत्यंत शुभ दिवस. पैशाचे लाभ. मन शांत आणि प्रसन्न.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)





[…] […]
[…] […]