आजचे राशिभविष्य सोमवार, ६ ऑक्टोबर २०२५
६ ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक(Marathi Rashi Bhavishya)
अश्विन शुक्ल चतुर्दशी/पौर्णिमा. शरद ऋतू. विश्वावसुनाम संवत्सर, शके १९४७, संवत २०८१.
राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
चंद्र नक्षत्र – उ. भा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मीन. (वृद्धी योग, विष्टी शांती)
“आज दुपारी १२.०० पर्यंत चांगला दिवस आहे” *कोजागिरी पौर्णिमा*
६ ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-(Marathi Rashi Bhavishya)
तुमच्यावर शुक्र ग्रहाचा प्रभाव आहे त्यामुळे तुम्ही स्वतः कलाकार असून कलाप्रिय आहात. तुमच्यामध्ये व्यापारी वृत्ती, अंतर्गत आवाजाची देणगी आणि व्यवहारिकता आहे. तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न आहे, मोहक आणि आकर्षक आहे. लोकांना तुमच्याबद्दल आकर्षण वाटते. रूढी आणि परंपरा याबद्दलच्या तुमच्या कल्पना समाजापेक्षा वेगळ्या असतात. तुम्हाला समजून घेणे इतरांना कठीण जाते. स्वतःचे निर्णय स्वतःच घेण्याकडे तुमचा कल असतो. तुमचे उद्दिष्ट काय आहे यावर लक्ष ठेवून ते साध्य करण्यासाठी तुम्ही सतत प्रयत्न करत असतात. तुमचे वक्तृत्व चांगले असते. जीवनात तुम्हाला मानसन्मान मिळतो. विविध समारंभांमध्ये भाग घेणे तुम्हाला आवडते. तुम्ही एक उत्तम सहकारी असतात. मित्रांना मदत करण्यात तुम्हाला सात्विक आनंद मिळतो. धर्म आणि तत्वज्ञाने या विषयांची आवड उत्पन्न होते. तुमचे आयुष्य आरामदायक आणि सुखलोलूप असते. तुम्ही उच्च प्रतीचे कपडे आणि दागिने वापरतात. स्वतःच्या प्रेमासंबंधींबाबत तुम्ही संशयी असतात. प्रेमात तुम्ही सावधपणे पावले टाकतात.
व्यवसाय:- बेकरी, हॉटेल, संगीतकार, जवाहर, आर्किटेक्ट, गृह सजावट, प्रयोगशाळा उपकरणे, मेडिकल स्टोअर्स, अकाउंट, पॅथॉलॉजी.
शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार.
शुभ रंग:- निळा आणि गुलाबी.
शुभ रत्न:- पाचु, मोती, हिरा.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
मेष:- व्यय स्थानी चंद्र आहे. आळशी लाभ योग आहे आत्मविश्वास जरी कमी झाला तरी आज अचानक धनलाभाचा योग् आहेत. कर्जे मंजूर होतील. बँकेतील कामाला गती मिळेल. गूढ उलगडतील.
वृषभ:- अनुकूल ग्रहमान आहे. तुमच्या राशीतील हर्षल शी अनुकूल चंद्राचा शुभ योग आहे. आज मनासारखी कामे होतील. तुमचा निर्णय अचूक ठरणार आहे. नेहमीपेक्षा वेगळ्या कल्पना सुचतील. मन उत्साही राहील.
मिथुन:- व्यवसाय आणि नोकरी यात काही मोठे बदल घडण्याचा कालावधी आहे. खर्च वाढेल मात्र त्याचे दुःख होणार नाही. सकाळच्या सत्रात महत्वाचे निर्णय घ्या.
कर्क:- नवम स्थानी चंद्र आहे. तुम्ही मुळात धार्मिक आहात. आज हर्षलची अनुकूलता अधिक आहे. त्यामुळे काहीतरी जगावेगळे करण्याची इच्छा होईल. अचानक लाभ होतील.
सिंह:- अष्टम स्थानी चंद्र आहे. सध्या तुमचा उत्साह दांडगा आहे. मन आनंदी आहे. आज काही अप्रिय घटना घडू शकतात. मात्र फारसे काजीचे कारण नाही. नोकरीच्या ठिकाणी अनोळखी व्यक्तीकडून सहकार्य लाभेल.
कन्या:- सप्तम स्थानी चंद्र आहे. नवम हर्षलशी शुभ योग आहे. आज अचानक प्रवास घडू शकतात. शत्रू पराभूत होतील. तुमचा मत्सर करणारे आज शांत राहतील. भाग्योदय होउ शकतो.
तुळ:- षष्ठ स्थानी चंद्र आहे. हर्षलची अशुभता आज काहीशी कमी जाणवेल. आर्थिक लाभ होतील. व्यवसाय वाढेल. आढचणींचा चक्रव्यूह भेदून तुम्ही यशाची पायरी चढू शकाल.
वृश्चिक:- आज यशाचा दिवस आहे. स्पर्धेत तुम्ही मोठी झेप घ्याल. शत्रू पराभूत होतील. दूर गेलेली व्यक्ती पुन्हा जवळ येईल. तुम्हाला होणार विरोध कमी होईल. अचानक शेअर्स किंवा लोटरीतून लाभ होतील.
धनु:- चतुर्थ स्थानी चंद्र आहे. शनी आणि नेपच्यूनशी आज युती आहे. आरोग्यात सुधारणा होईल. गुप्त शत्रूंचा त्रास कमी होईल. हरवलेली वस्तू सापडेल. नोकरीत अधिक लाभ होतील. जलपर्यटन घडेल.
मकर:– शेअर्स किंवा लॉटरीतुन अचानक लाभ होतील. अंदाज बरोबर येतील. नात्यात कटुता येऊ देऊ नका. आज नवीन ओळखी होतील. विवाह इच्छुकांना चांगली बातमी समजेल. बोलताना काळजी घ्या.
कुंभ:– द्वितीय स्थानी चंद्र आहे. धन स्थानात शनी आहे. तुम्हाला सध्या आर्थिक चणचण भासते आहे. कितीही उत्पन्न वाढले तरी खर्च देखील वाढत आहेत. वास्तू संबंधित व्यवहार आज पुढे सरकतील.
मीन:- आज तुमच्या राशीत चंद्र आहे. आज उत्तम व्यवसाय होणार आहे. आर्थिक लाभ भरपूर होणार आहेत. तुम्हाला यशासाठी काही काळ वाट बघावी लागणार आहे मात्र यश नक्कीच मिळणार आहे. पाणथळ जागेजवळ भाग्योदय होईल.
(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – (ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)
