आजचे राशिभविष्य शनिवार,२८ फेब्रुवारी २०२६

चंद्रग्रहणामुळे होळी पौर्णिमा कधी साजरी करायची ! 

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक(Marathi Rashi Bhavishya)
फाल्गुन शुक्ल द्वादशी/त्रयोदशी.विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८२.

राहुकाळ -सकाळी ९ ते १०:३० 
चंद्र – कर्क राशीत.  नक्षत्र – पुनर्वसू (सकाळी ९.३५ पर्यंत), नंतर पुष्य.  चंद्र त्रिकोण शनी, चंद्र लाभ हर्षल, चंद्र त्रिकोण नेपच्यून, बुध युती शुक्र.  
उत्तम दिवस.(Marathi Rashi Bhavishya)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ)चतुर्थ स्थानी चंद्र आहे. घरगुती आनंद मिळेल. स्थावर मालमत्तेचे व्यवहार लाभदायक ठरतील. मातृसुख लाभेल. बुध-शुक्र युतीमुळे आर्थिक व्यवहारात चांगली प्रगती होईल. वाहन खरेदीचा विचार करू शकता.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो)–तृतीय स्थानी चंद्र आहे. धाडस वाढेल. लहान प्रवास घडतील. भावंडांकडून सहकार्य मिळेल. चंद्र-शनी त्रिकोणामुळे कामात स्थैर्य येईल. नवीन करार फायदेशीर ठरतील.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा)-द्वितीय स्थानी चंद्र आहे. आर्थिक लाभ उत्तम होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. बुध-शुक्र युतीमुळे बोलण्यात गोडवा येईल. प्रलंबित रक्कम मिळू शकते.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो)-तुमच्याच राशीत चंद्र आहे. मन प्रसन्न राहील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. चंद्र-हर्षल लाभ योगामुळे अचानक लाभ संभवतो. कलात्मक क्षेत्रात यश मिळेल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे)-व्यय स्थानी चंद्र आहे. खर्च वाढतील. मात्र अध्यात्मिक लाभ मिळेल. चंद्र-नेपच्यून त्रिकोणामुळे अंतर्ज्ञान वाढेल. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत.
कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो)-लाभ स्थानी चंद्र आहे. मित्रांकडून मदत मिळेल. आर्थिक उत्पन्न वाढेल. बुध-शुक्र युतीमुळे व्यवसायात नफा वाढेल. जुनी योजना यशस्वी होईल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते)-दशम स्थानी चंद्र आहे. नोकरीत प्रतिष्ठा वाढेल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. नवीन जबाबदारी स्वीकाराल. समाजात मानमरातब वाढेल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु)-भाग्य स्थानी चंद्र आहे. भाग्योदयाची चिन्हे दिसतील. प्रवासातून लाभ मिळेल. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. चंद्र-शनी योगामुळे दीर्घकालीन लाभ होतील.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) – अष्टम स्थानी चंद्र आहे. गुप्त लाभ संभवतो. संशोधनात्मक कामात यश मिळेल. मात्र आरोग्याची काळजी घ्या. अचानक खर्च संभवतो. संयम ठेवा.
मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी)-सप्तम स्थानी चंद्र आहे. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. नवीन करार फायदेशीर ठरतील. सामाजिक संबंध दृढ होतील.
कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा)- षष्ठ स्थानी चंद्र आहे. शत्रूंवर विजय मिळवाल. आरोग्य सुधारेल. कामाचा ताण कमी होईल. कर्ज व्यवहारात सुटका मिळेल. संयम राखा.
मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची)- पंचम स्थानी चंद्र आहे. संततीसुख लाभेल. प्रेमसंबंध दृढ होतील. सर्जनशील कार्यात यश मिळेल. चंद्र-नेपच्यून योगामुळे कल्पनाशक्ती वाढेल.((Marathi Rashi Bhavishya))

चंद्रग्रहणामुळे होळी पौर्णिमा कधी साजरी करायची ! 
या वर्षी ३ मार्च रोजी चंद्रग्रहण होणार आहे. म्हणूनच, सर्वात मोठा प्रश्न म्हणजे रंग कधी खेळले जातील? खगोल तसेच ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्रग्रहणाच्या नऊ तास आधी सुतक काळ सुरू होतो.
धर्मसिंधू नुसार सुतक काळात, कोणतेही धार्मिक उत्सव टाळले जातात. म्हणून, धुलीवंदन सण ४ मार्च २०२६ रोजी साजरा केला जाईल. शास्त्रांचा विचार केल्यास, ग्रहण संपल्यानंतर रंग खेळले जाऊ शकतात. म्हणून, धुलिपोर्णिमा/ धुळवड/धुळंदी/उत्तर भारतातील रंगोत्सव पोर्णिमा ४ मार्च रोजी साजरी केली जाईल.

चंद्रग्रहण वेळ
कॅलेंडरनुसार, या वर्षी होळीच्या वेळी चंद्रग्रहण होईल, जे भारतात दिसेल. त्यामुळे, संपूर्ण भारतात ग्रहणाचा सुतक काळ लागू असेल. भारतीय प्रमाण वेळेनुसार, चंद्रग्रहण ३ मार्च रोजी दुपारी ३:२० वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी ६:४७ वाजता संपेल. चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी ३ तास २७ मिनिटे दिसेल.

होलिका दहन कधी होईल?
यंदा पंचांगानुसार, पौर्णिमा तिथी २ मार्च २०२६ रोजी संध्याकाळी ५ वाजून ५५ मिनिटांनी सुरू होईल आणि ३ मार्च २०२६ रोजी संध्याकाळी ५ वाजून ०७ मिनिटांनी संपेल. म्हणून होलिका दहन मंगळवारी ३ मार्च २०२६ रोजी केले जाईल. या काळात भद्रा काळ सुरू होणार आहे. २ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजून ५५ मिनिटांनी भद्रा काळ सुरु होऊन ३ मार्च रोजी सकाळी ५ वाजून ३२ मिनिटांपर्यंत असेल. भद्रा काळात कोणतेही शुभ कार्ये केली जात नाहीत. त्यामुळे तो काळ संपल्यानंतर ३ मार्च २०२६ रोजी होलिका दहन करणे योग्य ठरेल.होलिका दहनासाठी ३ मार्च रोजी संध्याकाळी ६ वाजून २२ मिनिटांपासून ते रात्री ८ वाजून ५० मिनिटांपर्यंत शुभ काळ असेल. या काळात होलिकेची पूजा आणि दहन करणे शुभ मानले जात आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न: होलीका दहन कधी आहे?
उत्तर – ३ मार्च रोजी संध्याकाळी ६ वाजून २२ मिनिटांपासून ते रात्री ८ वाजून ५० मिनिटांपर्यंत शुभ काळ
प्रश्न: रंगहोळी कधी आहे?
उत्तर: ४ मार्च रोजी रंगहोळी साजरी केली जाईल.
प्रश्न: चंद्रग्रहण कधी आहे?
उत्तर: ३ मार्च २०२६ रोजी चंद्रग्रहण होणार आहे.
प्रश्न: चंद्रग्रहणाची वेळ काय आहे?
उत्तर: ३ मार्च २०२६ रोजी दुपारी ३:२० ते संध्याकाळी ६:४७ पर्यंत चंद्रग्रहण राहील.
प्रश्न: धुलिपौर्णिमा/धुळवड/धुळंदी/रंगोत्सव कधी आहे?
उत्तर: धुळवड/धुळंदी किंवा रंगांचा सण ४ मार्च रोजी साजरा केला जाईल.
प्रश्न: रंगपंचमी कधी आहे?
उत्तर: रंगपंचमी, कृष्ण पक्ष पंचमीरविवार, ०८ मार्च २०२६ रोजी आहेपंचमी तिथी प्रारंभ: ०७ मार्च २०२६ संध्याकाळी ०७:१७ वाजतापंचमी तिथी समाप्ती : ०८ मार्च २०२६ रात्री ०९:१० वाजता

महत्वाची माहिती:
चंद्रग्रहणतारीख: मंगळवार, ३ मार्च २०२६
सूतक सुरू – सकाळी ९:३९
सूतक संपतो – संध्याकाळी ६:४६
सूतकमुळे मंदिराचे दरवाजे बंद राहतील. रात्रीच्या आरतीनंतर ते उघडतील.चंद्रग्रहण सुरू होते (चंद्रोदयासह) – संध्याकाळी ६:२६चंद्रग्रहण संपते – संध्याकाळी ६:४६चंद्रोदय – संध्याकाळी ६:२६स्थानिक ग्रहण कालावधी – ०० तास २० मिनिटे २८ सेकंद
स्पर्श – दुपारी ०३:२१
एकूण ग्रहण सुरू होते – दुपारी ३:२०
एकूण चंद्रग्रहण – दुपारी ०५:०४
एकूण ग्रहण समाप्त होते – संध्याकाळी ०५:३३
मोक्ष शेवटचा संपर्क – संध्याकाळी ०६:४६
मोक्ष – सकाळी ०७:५२
मंगळवारी ३ मार्च २०२६ सूर्योदयापासून मोक्षपर्यंत संध्याकाळी ६:४८ पर्यंत ग्रहणाचे वेध पाळावे.आजारी,वृद्ध, बालक, गर्भवती नि मंगळवारी सकाळी ११ वाजल्या पासून वेध पाळावे.वेध काळात  भोजन घेणे वर्ज आहे पण पाणी पिऊ शकता.सूर्यास्त झाल्यावर स्नान करून नंतर सर्व कामे ठरू शकता.ग्रहण फल:-शुभ फल-मिथुन,तुळ,वृश्चिक, मीन संमिश्र फल-मेष,कर्क,धनू,कुंभअनिष्ट फल-वृषभ,सिंह,कन्या,मकरया राशी ना आहे.अनिष्ट फल, आणि  गर्भवती स्त्रियांनी ग्रहण पाहू नये.ग्रहण काळात जप,दान ,श्राद्ध करु शकता
सौ मधुरा मंगेश पंचाक्षरी
श्री मंगेश कमलाकर पंचाक्षरीनासिक
(दाते पंचांगा नुसार)

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – .ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521)

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!