ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक , Marathi Rashi Bhavishya
श्रावण शुक्ल नवमी/दशमी | शके १९४७ | संवत २०८१ | विश्वावसुनाम संवत्सर
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
चंद्रनक्षत्र – विशाखा (सकाळी ६.३५ नंतर अनुराधा)
आज जन्मलेल्या बाळाची राशी – वृश्चिक
🪔 “आज सकाळी ७.०० नंतरचा दिवस चांगला आहे. शुभ कार्यांसाठी योग्य वेळ!” 🪔
Marathi Rashi Bhavishya
🔴 मेष (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
अष्टमस्थानी चंद्र असूनही आज दिवस तुमच्यासाठी सकारात्मक ठरेल.
👉 सन्मान, आत्मिक समाधान, आध्यात्मिक लाभ मिळतील.
👉 निसर्ग सहलीसाठी उत्तम योग.
👉 मनोबलात वाढ होईल.
🟠 वृषभ (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
सप्तमस्थानी चंद्र लाभदायक.
👉 पराक्रम गाजवाल, सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.
👉 नोकरीत योग्य संधी.
👉 लेखकांना विशेष यश.
🟡 मिथुन (का, की, कु, घ, गं, छा, के, को, ह)
षष्ठ चंद्र असूनही चांगला दिवस आहे.
👉 एखादी महत्त्वाची खरेदी होईल.
👉 प्रवासाचे नियोजन बदलेल.
👉 वाणीची मोहकता लाभदायक ठरेल.
🟢 कर्क (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
पंचमस्थानी चंद्रामुळे अनुकूल वेळ.
👉 अचानक लाभ.
👉 सामाजिक कार्यात सहभाग.
👉 छोटी सहल घडेल.
👉 सूर्य उपासना लाभदायक.
🔵 सिंह (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
उत्तम प्रगतीचा दिवस.
👉 वरिष्ठांचे आशीर्वाद.
👉 कौटुंबिक सौख्य.
👉 मौल्यवान वस्तू खरेदी होण्याची शक्यता.
👉 हनुमान उपासना करा.
🟣 कन्या (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
तृतीय चंद्र यशाची नांदी देतो.
👉 आरोग्यात सुधारणा.
👉 व्यवसायात वाढ.
👉 संशोधन कार्यात यश.
👉 परदेश प्रवासाचे संकेत.
⚪ तुळ (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
संमिश्र अनुभव.
👉 आर्थिक लाभ होईल.
👉 वारसासंबंधी कामे मार्गी लागतील.
👉 प्रवास घडेल, वाहन जपून चालवा.
🟤 वृश्चिक (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
तुमच्याच राशीत चंद्र.
👉 सामाजिक क्षेत्रात दबदबा.
👉 प्रिय व्यक्ती भेटेल.
👉 कार्यक्षमता वाढेल.
👉 चांगली संधी मिळण्याची शक्यता.
🟥 धनु (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
व्ययस्थानी चंद्र – संमिश्र परिणाम.
👉 आर्थिक लाभ.
👉 हरवलेली वस्तू सापडेल.
👉 थोडा वैचारिक ताण.
👉 संततीचे आगमन.
🟩 मकर (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
चंद्र अनुकूल.
👉 राजकीय क्षेत्रात लाभ.
👉 गुंतवणुकीतून फायदा.
👉 आनंददायी घटना.
👉 पुण्यकर्म घडतील.
🟦 कुंभ (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
दशमस्थानी चंद्र.
👉 कामात वाढ.
👉 तणाव अधिक पण लाभदायक.
👉 प्रसिद्धी मिळेल.
👉 वाहन काळजीपूर्वक चालवा.
🟪 मीन (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
नवमस्थानी चंद्र.
👉 कामात प्रगती.
👉 विरोधक पराभूत होतील.
👉 दूरचे प्रवास शक्य.
👉 सामाजिक कार्यात यश.
३ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर गुरु, रवी आणि शनी या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्हाला इतरांशी सहज संवाद साधता येतो. दया, न्याय, सात्विकता, नैतिकता, परोपकार ही तुमची वैशिष्ट्ये आहेत. तुम्ही सहसा संयमी असतात मात्र ज्या वेळी शनीचा प्रभाव वाढतो त्यावेळी तुम्ही भावना प्रधान होतात. तुम्हालाया स्वतःचे काम स्वतः करायला आवडते. इतरांची ढवळाढवळ चालत नाही. तुम्ही महत्वाकांक्षी असून एखादी योजना पार पाडायची असेल तेव्हा तुम्हाला एकटे राहणे आवडते. तुमचा ओढा बंधुमान , संशोधक, हुशार व्यक्तीकडे असतो. तुम्हा जीवनात चांगले यश मिळते. तुमचा सतत उत्कर्ष होतो. तुम्ही एक उत्तम न्यायाधीश, धर्मगुरू, शिक्षक बनू शकतात. तुम्ही स्वयंपूर्ण आहात. तुम्हाला दिखाऊपणा आणि मोठ्याने बोलण्याची सवय असू शकते. तुमचे मन तरुण आणि स्वच्छंदी आहे. तुम्हाला मैदानी खेळांची आवड असते. तुम्ही सहिष्णू आणि विश्वासार्ह आहात. तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला जाऊ नये म्हणून तुम्ही जागरूक राहणे आवश्यक आहे.
व्यवसाय:- न्यायमूर्ती, सेक्रेटरी, राजदूत, मुत्सद्दी, उच्चपदस्थ अधिकारी, संरक्षण खाते, प्राध्यापक, धार्मिक प्रवचनकार, डॉक्टर, शिक्षक, मोल्डिंग, तेल गिरण्या, शेती, जंगल, कारखाने, लाकूड, खनिज द्रव्य, खाद्यपदार्थ.
शुभ दिवस:- मंगळवार, गुरुवार, शुक्रवार.
शुभ रंग:- पिवळा, जांभळा, हिरवा.
शुभ रत्न:- पुष्कराज, लसण्या, अमेथीस्ट.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
📞 व्यक्तिगत कुंडली, पती-पत्नीचे स्वभाव, भाग्योदय, शुभरत्ने यासाठी संपर्क साधा – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक – 8087520521
🌐 अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या.
🙏 “शुभम भवतु कल्याणम्”!
