
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
कार्तिक कृष्ण द्वादशी. विश्वावसु नाम संवत्सर, शके १९४७, संवत २०८१
चंद्र – कन्या राशीत.
नक्षत्र – हस्त.
आज उत्तम दिवस आहे. चंद्र – लाभ – मंगळ.(Marathi Rashi Bhavishya)
वार – रविवार (सूर्याचा दिवस)
मेष चंद्र आपल्या षष्ठ स्थनात कन्या राशीत असल्याने व्यवसाय वाढेल. नवीन कामाला शुभारंभ करू शकता. प्रवास लाभदायक. आरोग्य उत्तम.
वृषभ आर्थिक बाजू मजबूत राहील. घरातील वडिलधाऱ्यांचे सहकार्य लाभेल. मनातील चिंता कमी होतील. खर्चावर नियंत्रण ठेवा.
मिथुन आजचा दिवस गतीमान. मित्रमंडळातून शुभ बातमी. नोकरीत प्रगतीचे योग. पण निर्णय शांतपणे घ्या.
कर्क प्रभावक्षेत्र वाढेल. वरिष्ठांकडून कौतुक. घरातील जबाबदारी वाढेल पण काम नीट पार पडेल. आरोग्याची काळजी घ्या.
सिंह नवीन संपर्क फायदेशीर. प्रवास योग. विद्यार्थ्यांना गुरु-कृपा. कोर्ट-कचेरीचे काम पुढे जाईल. आत्मविश्वास वाढेल.
कन्या आर्थिक लाभ. नातेवाईकांसोबत मतभेद मिटतील. वैवाहिक आयुष्यात समाधान. गुंतवणूक सावध करा.
तुळ भागीदारीत फायदा. व्यवसायिकांना चांगले उत्पन्न. शरीरातील थकवा जाणवू शकतो. डायटची काळजी घ्या.
वृश्चिक ताण कमी होईल. जुन्या कामात गती येईल. आर्थिक पेमेंट अडकले असल्यास मिळण्याची शक्यता. प्रिय व्यक्तीसोबत उत्तम वेळ.
धनु भाग्य तुमच्या बाजूने. धार्मिक कार्यात रुची. प्रवास योग शुभ. मुलांच्या कामात प्रगती. आरोग्य स्थिर.
मकर कामात उत्साह. नवीन जबाबदारी येईल. आज घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. खर्च थोडा वाढेल.
कुंभ लहानशी अडचण येऊ शकते, पण ती लवकर सुटेल. कामात अचूकता ठेवा. पैशाचे नियोजन गरजेचे.
मीन संबंधांमध्ये आनंद. कामात सहकाऱ्यांचा सपोर्ट. उत्पन्नाचे नवे स्त्रोत दिसतील. मन प्रसन्न राहील.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)



