prsanna

आजचे राशिभविष्य गुरुवार, ४ डिसेंबर २०२५

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

1

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक  (Marathi Rashi Bhavishya)

मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशी / पौर्णिमा (क्षय तिथी)  

चंद्र मेष राशीत |   भरणी कृत्तिका नक्षत्र  

योग रवी प्रतियुती चंद्र |चंद्र प्रतियुती शुक्र |चंद्र लाभ नेपच्यून  दक्षिणायन |सौर हेमंत ऋतू |

शके १९४७ | संवत २०८२  

आज दत्त जयंती. आध्यात्मिक उन्नती व कृपेचा दिवसआजचा दिवस द्विधा परिणाम देणारा आहे.

रवीचंद्र प्रतियुती मनात चढउतार निर्माण करू शकते, तर चंद्रशुक्र प्रतियुती नात्यांमध्ये थोडे ताण आणू शकते.

परंतु चंद्रनेपच्यून लाभयोग सूक्ष्म अंतर्ज्ञान, आध्यात्मिक जाणीव, कलात्मक प्रेरणा आणि दिव्य मार्गदर्शन देणारा आहे.

क्षय तिथीमुळे नकारात्मकता कमी करून नवीन शुभ आरंभाची बीजं पेरण्याचा विशेष परिणाम.  (Marathi Rashi Bhavishya)

मेष –मनात वेगवेगळे विचार येतील, पण कामांमध्ये छान प्रगती. दत्त जयंतीमुळे मानसिक शांतता वाढेल. प्रेमसंबंधात संयम.

वृषभ -दुपारी तणाव वाढेल, संवादात चुका टाळा. आर्थिक कामांमध्ये सावधगिरी. संध्याकाळी अंतर्ज्ञानी निर्णय लाभदायी ठरतील.

मिथुन -कार्यस्थळी महत्त्वाचे बदल. नात्यांमध्ये पारदर्शकता आवश्यक. सर्जनशीलतेला उत्तम चालना. आध्यात्मिक कृतीत शांती.

कर्क –कौटुंबिक वातावरण सुखद. परदेश किंवा प्रवास संबंधी कार्यांना वेग. प्रेमसंबंधात गैरसमज टाळा. दुपारी मन स्थिर ठेवा.

सिंह –नोकरीत नवीन संधी. आर्थिक लाभाची शक्यता. आरोग्य सांभाळा. कलात्मक कामात प्रगती. दत्तकृपेने अडथळे दूर होतील.

कन्या -आज मोठे निर्णय टाळा. प्रतियुतींमुळे भावनिक उतारचढाव. संध्याकाळी देवकार्य, जपध्यान मनाला शांती देईल आणि मार्गदर्शन मिळेल.

तुळ -पार्टनरशिप मध्ये सावधगिरी आवश्यक. आर्थिक बाबतीत फायदा. घरगुती चांगल्या घटना. संवाद सौम्य ठेवा.

वृश्चिक –आरोग्याकडे लक्ष द्या. नोकरीत बदलाचे संकेत. अंतर्ज्ञानाने घेतलेले निर्णय फायदेशीर. दत्त जयंतीचा दिवस आध्यात्मिक शक्ती देणारा.

धनु –विद्यार्थ्यांसाठी अतिशय शुभ दिवस. कल्पनाशक्ती आणि लेखन कार्यात लाभ. प्रेमसंबंध गोड. आर्थिक स्थितीत सुधारणा.

मकर -घरातील वातावरण चांगले. मालमत्ता किंवा घराशी संबंधित कामांसाठी शुभ. भावनिक ताण कमी होत जाईल. दुपारी शांतता आवश्यक.

कुंभ –प्रवास किंवा मीटिंगमध्ये फायदा. नवे संपर्क लाभदायी. प्रतियुतीमुळे वाद टाळा. संध्याकाळी आध्यात्मिक उन्नती.

मीन –अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता. सर्जनशील कामात उत्कृष्टता. नात्यांमध्ये समजूतदारपणा ठेवा. चंद्रनेपच्यून योगामुळे अंतर्ज्ञान प्रखर.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

1 Comment
Don`t copy text!