

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
पौष शुक्ल त्रयोदशी.
विश्वावसुनाम संवत्सर.
शके १९४७, संवत २०८२.
राहुकाळ – दुपारी १.३० ते ३.००
“आज शुभ दिवस आहे”
(प्रदोष व्रत)
नक्षत्र – रोहिणी / (रात्री १०.४९ नंतर) मृग
आज जन्मलेल्या बाळाची राशी – वृषभ
१ जानेवारी रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:- (Marathi Rashi Bhavishya)
तुम्ही उत्साही, कल्पक, चपळ, कलाप्रेमी आहात. तुमच्यात उत्स्फूर्तता आहे. जीवनाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन आनंदी आणि मनसोक्त आहे. सर्व प्रकारच्या सामाजिक थरात तुमची उठबस असते. जीवनात तुम्ही यशस्वी होतात आणि तुमचा मित्र परिवार मोठा असतो तरीही तुम्ही मनातून एकटे असतात. बऱ्याच बाबतीत तुम्हाला अंतस्फूर्ती होते. तुम्हाला उत्तम वक्तृत्व लाभते. दुय्यम कामे करणे तुम्हाला आवडत नाही. तुमच्या कामकाजात ढवळाढवळ करणारे लोकं तुम्हाला आवडत नाहीत. नात्यातील जेष्ठ व्यक्ती सांभाळण्याची किंवा आजारी व्यक्ती सांभाळण्याची जबाबदारी तुमच्यावर येऊन पडते. इतरांची मने ओळखणे तुम्हाला उत्तम जमते.
व्यवसाय- वेशभूषा, चित्रपट, कला, जाहिरात, कँटीन, पुस्तकविक्री यात यश लाभते.
शुभ दिवस – रविवार, बुधवार, गुरुवार.
शुभ अंक – १,५,७
शुभ रंग- सोनेरी
आजचे ग्रहयोग:
रवी ष चंद्र, बुध केंद्र नेपच्यून
♈ मेष :- (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)–आजचा दिवस संयमाचा आहे. रवी-चंद्र षडाष्टक योगामुळे कामात अडथळे येऊ शकतात. बोलताना शब्द जपून वापरा. प्रदोष व्रत केल्यास मानसिक शांतता लाभेल. संध्याकाळनंतर परिस्थिती सुधारेल.
♉ वृषभ :- (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)–चंद्र तुमच्या राशीत असल्याने आत्मविश्वास वाढेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. आर्थिक बाबतीत स्थैर्य येईल. कौटुंबिक सुख लाभेल. प्रदोषामुळे शिवकृपा मिळेल.
♊ मिथुन :- (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)–आज अंतर्मुखता वाढेल. बुध केंद्र नेपच्यूनमुळे संभ्रम निर्माण होऊ शकतो. कागदपत्रे व व्यवहार तपासून करा. अध्यात्मिक वाचन लाभदायक ठरेल.
♋ कर्क :- (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)–मित्रपरिवारातून सहकार्य मिळेल. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुलतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. प्रदोष व्रताचे पालन केल्यास मन प्रसन्न राहील.
♌ सिंह :- (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)–नोकरीत जबाबदारी वाढेल. वरिष्ठांशी मतभेद टाळा. रवी ष चंद्र योगामुळे थोडा तणाव जाणवेल. संध्याकाळनंतर शुभ बातमी मिळू शकते.
♍ कन्या :- (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)–प्रवासाचे योग आहेत. धार्मिक कार्यात रुची वाढेल. बुध-नेपच्यून योगामुळे कल्पकतेला वाव मिळेल. विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे.
♎ तुळ :- (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)–आर्थिक व्यवहारात सावधगिरी आवश्यक आहे. अचानक खर्च वाढू शकतो. प्रदोष व्रत केल्यास अडचणी कमी होतील. मानसिक स्थैर्य राखा.
♏ वृश्चिक :- (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)–भागीदारी व्यवहारात यश मिळेल. जोडीदाराकडून सहकार्य लाभेल. आजचा दिवस संबंध दृढ करणारा आहे. संध्याकाळनंतर आनंददायी घटना घडेल.
♐ धनु :- (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)आरोग्याकडे लक्ष द्या. कामाचा ताण जाणवेल. रवी ष चंद्र योगामुळे थकवा येऊ शकतो. प्रदोष उपासना लाभदायक ठरेल.
♑ मकर :- (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)–विद्यार्थ्यांसाठी व कलाकारांसाठी उत्तम दिवस. सर्जनशीलतेला चालना मिळेल. संततीकडून आनंद मिळेल. आर्थिक लाभ संभवतो.
♒ कुंभ :- (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)–घरगुती बाबींकडे लक्ष द्यावे लागेल. स्थलांतर किंवा वास्तूविषयक चर्चा होऊ शकते. मन थोडे अस्थिर राहील, मात्र संध्याकाळनंतर शांतता लाभेल.
♓ मीन :- (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)–संवादकौशल्य वाढेल. लेखन, वक्तृत्व, व्यवसायात यश मिळेल. प्रदोषामुळे ईश्वरकृपा प्राप्त होईल. दिवस एकूण शुभ आहे.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – .ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521)



[…] आजचे राशिभविष्य गुरुवार, १ जानेवारी २… […]