
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
पौष शुक्ल दशमी/एकादशी.,पुत्रदा स्मार्त एकादशी.
शके १९४७, संवत २०८२.,हेमंत ऋतू. उत्तरायण.,विश्वावसुनाम संवत्सर.
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
आज क्षय तिथी आहे.पुत्रदा एकादशीमुळे धार्मिक, आध्यात्मिक कार्यांसाठी विशेष अनुकूल दिवस.
चंद्र नक्षत्र – भरणी.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मेष. (संध्याकाळी विष्टी करण)
आजचे ग्रहयोग: रवी त्रिकोण
चंद्र – आत्मविश्वास, प्रतिष्ठा वाढ
चंद्र त्रिकोण मंगळ – उत्साह, धाडसी निर्णय
चंद्र लाभ गुरू – आर्थिक लाभ, मार्गदर्शन, शुभ संधी (Marathi Rashi Bhavishya)
मेष(चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)-आज कामाचा उत्साह चांगला राहील. वरिष्ठांकडून प्रशंसा मिळू शकते. आर्थिक व्यवहारात लाभ संभवतो. मात्र उतावळेपणा टाळा. आरोग्याकडे लक्ष द्या.
वृषभ(इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)-घरगुती सुख वाढेल. वाहन, जमीन, घर यासंबंधी चर्चा पुढे सरकतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. धार्मिक कार्यात मन रमेल.
मिथुन(का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)-आज संपर्क क्षेत्रातून लाभ होईल. लेखन, बोलणे, चर्चा यामध्ये यश मिळेल. भावंडांशी संबंध दृढ होतील. खर्चावर नियंत्रण ठेवा.
कर्क(हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)-आर्थिक स्थैर्य जाणवेल. बचतीकडे लक्ष द्याल. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. आईकडून मार्गदर्शन मिळेल.
सिंह(मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)-आज आत्मविश्वास उच्च राहील. निर्णय क्षमतेत वाढ होईल. मान-सन्मान, प्रतिष्ठा मिळेल. मात्र अहंकार टाळावा.
कन्या(टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)-नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. नियोजनबद्ध कामामुळे यश मिळेल. आरोग्य उत्तम राहील. सहकाऱ्यांकडून मदत मिळेल.
तूळ(रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)-आज अंतर्मुखता वाढेल. खर्च वाढू शकतो. ध्यान, जप, उपासना केल्यास मानसिक शांती लाभेल. प्रवास टाळलेला बरा.
वृश्चिक(तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)-मित्रांकडून सहकार्य मिळेल. उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडतील. एखादी जुनी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे.
धनु (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)-कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील. वरिष्ठांचा दबाव जाणवेल. संयम ठेवल्यास यश निश्चित मिळेल.
मकर(भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)-भाग्याची साथ मिळेल. प्रवास, शिक्षण, कायदेशीर बाबी अनुकूल राहतील. गुरुकृपा लाभेल.
कुंभ(गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)-आरोग्याकडे लक्ष द्या. अचानक खर्च संभवतो. गोपनीय बाबी उघड करू नका. संयम आवश्यक.
मीन(दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)-घरगुती विषयांना प्राधान्य द्यावे लागेल. जोडीदाराचा सल्ला उपयुक्त ठरेल. मानसिक समाधान मिळेल.
शुभ रंग: पिवळा, पांढरा
शुभ अंक: २, ३, ९
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – .ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521)



[…] […]