ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक Marathi Rashi Bhavishya
🗓 तिथी: वैशाख/ज्येष्ठ शुक्ल प्रतिपदा
🌞 ऋतू: ग्रीष्म
🪐 संवत्सर: विश्ववसु
🕒 राहुकाळ: दुपारी ३:०० ते ४:३०
🌙 चंद्र नक्षत्र: रोहिणी
👶 आज जन्मलेल्या बाळाची राशी: वृषभ
📌 विशेष: आज क्षय तिथी व करिदिन आहे. Marathi Rashi Bhavishya
🔮 राशीभविष्य:
♈ मेष (Aries)
चंद्र-मंगळ शुभयोगाने कौटुंबिक सुख व आर्थिक भरभराट होईल. परंतु कर्ज घेणे टाळा. सन्मानात वाढ संभवते.
♉ वृषभ (Taurus)
आर्थिक लाभाचे संकेत आहेत. समाजात प्रतिष्ठा वाढेल. आत्मविश्वास उच्च असेल पण अहंकार टाळावा.
♊ मिथुन (Gemini)
व्यययोगामुळे खर्च वाढेल. आध्यात्मिक मार्ग उत्तम. सरकारी त्रास संभवतो, दानधर्म हितकारी ठरेल.
♋ कर्क (Cancer)
लाभयोग सक्रिय. नवा व्यवहार किंवा खरेदी होण्याची शक्यता. मन प्रसन्न राहील, इच्छित कार्ये होतील.
♌ सिंह (Leo)
व्यवसायात यश, आर्थिक लाभ. नोकरीत चांगली संधी मिळेल. ग्रहमान पूर्णतः सकारात्मक.
♍ कन्या (Virgo)
पवित्र विचार, आध्यात्मिक अनुभव. प्रवास संभवतो. आरोग्याची काळजी घ्या, मानसिक शांतता लाभेल.
♎ तुळ (Libra)
अष्टम स्थानातील चंद्र गूढतेकडे आकर्षित करेल. संपत्ती लाभेल, पण नैतिकतेचा मार्ग न सोडणे महत्त्वाचे.
♏ वृश्चिक (Scorpio)
व्यवसायात यश, मित्रांकडून साथ. जोडीदाराकडून आनंद. पूर्वीचे प्रयत्न फळ देतील.
♐ धनु (Sagittarius)
कष्टाला योग्य फळ मिळेल. आर्थिक लाभ, मानसिक समाधान. सामाजिक सन्मान वाढेल.
♑ मकर (Capricorn)
आजचा दिवस प्रगतीचा. व्यवसाय वृद्धी, संततीकडून शुभवार्ता. उत्साहात काम पूर्ण कराल.
♒ कुंभ (Aquarius)
चतुर्थ स्थानातील रवी-चंद्र युतीमुळे घरगुती तणाव संभवतो. संयम आवश्यक. संततीकडून आधार मिळेल.
♓ मीन (Pisces)
उत्तम आर्थिक लाभ. उत्साही घटना घडतील. प्रवास संभवतो. कार्यसिद्धीचा दिवस.
२७ मे रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
🎉 तुमच्यावर मंगळ, बुध आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमच्यात जबरदस्त आत्मविश्वास आहे. तुमचे व्यक्तिमत्व विरोधाभासी आहे. दुरबल लोकांना मदत करणे तुम्हाला आवडते. भिन्न लिंगी व्यक्तीबद्दल आकर्षण असते मात्र तुम्ही मोह टाळणे उत्तम. तुम्ही भावनाप्रधान आणि लहरी असू शकतात. त्यामुळे तुमचा स्वभाव चटकन इतरांना समजत नाही. दुराग्रह टाळला पाहिजे. किरकोळ बाबींवरून तुम्ही अस्वस्थ होतात. न्याय प्रिय आहात. तुम्ही सभ्य आणि मोठा मनाचे आहात. मित्रांशी तुम्ही प्रामाणिक असतात. कोणत्याही जबाबदारी घेतल्यासतुम्हाला त्यात यश मिळते. प्रकृती सुदृढ असते. मात्र विकारांवर ताबा ठेवला पाहिजे. वक्तृत्व चांगले असते. स्वभाव हरहुन्नरी आणि स्वतंत्र असतो. तुम्ही आक्रमक स्वभावाचे, धाडसी, कामात तत्पर आणि प्रतिकार करण्यास सक्षम आहात. थोडक्यात म्हणजे तुम्ही लढाउ वृत्तीच्या आहात. कधी कधी तुम्ही स्वतः होऊनच एखादे भांडण उकरून काढतात. तुम्ही महत्वाकांक्षी आहात आणि एखाद्या विषयाचा पूर्ण अभ्यास करणे तुम्हाला आवडते. शक्यतो तुम्ही इतरांचा सल्ला मानत नाहीत. मनात घेतलेले काम तुम्ही पूर्ण करतातच. कधीकधी तुमच्यात उतावळेपणा असू शकतो. तुमच्याकडे उत्तम वक्तृत्व आहे. शिकवण्यात तुम्हाला खरा आनंद मिळतो. मोठेपणा, प्रतिष्ठान, मान सन्मान याला तुम्ही प्राधान्य देतात. वारसा हक्काने तुम्हाला संपत्ती मिळते. स्मरणशक्ती चांगली असते. सरकारी पातळीवर तुम्हाला मानसन्मान मिळतात. स्वतःची चूक मान्य करणे तुम्हाला फारसे पसंत नसते. शक्यतो तुम्ही इतरांवर टीका करणे टाळावे आणि नम्र राहावे यात तुमचा फायदा आहे. तुम्ही शक्तिवान असतात. तुम्हाला मैदानी खेळांची आवड आहे. तुम्ही काहीसे शीघ्रकोपी असले तरी अनेकदा स्वतःच्या मनावर ताबा ठेवू शकतात. तुमच्या विचारांमध्ये ठामपणा आहे. तुम्हाला प्राणी आणि निसर्ग यांची आवड आहे. तुम्ही मोठ्या अधिकाराच्या जागा सांभाळू शकतात.
तुम्ही अहंकार टाळला पाहिजे.
व्यवसाय:- बेकरी, हॉटेल, दागिने विक्री, आर्किटेक्ट, गृहसजावट, मिल्ट्री, पोलीस, इंजिनीयर, लोखंड. बांधकाम क्षेत्र.
शुभ दिवस:– सोमवार, मंगळवार, गुरुवार.
शुभ रंग:- तांबडा, पांढरा, पिवळा.
शुभ रत्न:- पुष्कराज, मोती, माणिक.
(रत्ने वापरण्यापूर्वी कुंडलीचा अभ्यास करावा)
📞 अधिक मार्गदर्शनासाठी संपर्क:
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521
कुंडली विश्लेषण, रत्न सल्ला, व्यवसाय-लग्न मार्गदर्शन.

[…] आजचे राशीभविष्य | मंगळवार, २७ मे २०२५ […]
[…] ३:०० 🌟 आज जन्मलेल्या बाळाची राशी – मिथुन. (शूल योग […]
[…] व्यक्तिगत कुंडली विश्लेषणासाठी संपर्क साधा – […]