आजचे राशिभविष्य बुधवार, ३१ डिसेंबर २०२५

३१ डिसेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये

2

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक(Marathi Rashi Bhavishya)

पौष शुक्ल एकादशी/द्वादशी.विश्वावसुनाम संवत्सर.

शके १९४७, संवत २०८२.

राहुकाळ दुपारी १२.०० ते १.३०

आज वर्ज्य दिवस आहे”(भागवत एकादशी)

नक्षत्र कृतिका (दिवसभर)

आज जन्मलेल्या बाळाची राशी मेष / (सकाळी ९.२३ नंतर) वृषभ

ग्रहयोग:

चंद्र लाभ शनी,

चंद्र युती हर्षल,

चंद्र लाभ नेपच्यून

३१ डिसेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-(Marathi Rashi Bhavishya)

तुम्ही भावनाशील आहात मात्र भावनांचे प्रदर्शन करणे तुम्हाला आवडत नाही. तुमचे आयुष्य अनेक अनपेक्षित चढ उतारानी भरलेले आहे. मोठ्या जबाबदाऱ्या स्वीकारणे तुम्हाला मनापासून आवडते आणि त्यात यशही मिळते. वादविवाद घालण्यात तुमचा विनाकारण वेळ जातो. आर्थिक बाबतीत तुम्ही भाग्यवान आहात. तुम्हाला अनेक नवनवीन कल्पना सुचतात आणि त्या राबवण्याससाठी तुम्ही योग्य व्यक्तींची निवड करतात. या बाबतीत तुम्हाला चांगले यश मिळते. मनातल्या सर्वच गोष्टी काही तुम्ही इतरांना सांगत नाहीत. अहंकार आणि गर्व टाळला पाहिजे.वयाच्या चाळीस नंतर भाग्योदय होईल. वारसा हक्काने संपत्ती मिळेल. त्यात वाढ करावी, किमान ती आहे तशी सांभाळावी. इंजिनीअर, बिल्डर, संशोधन, बँकिंग यात यश मिळेल.

शुभ दिवस- शनिवार, रविवार, सोमवार

शुभ अंक – १,४,७

शुभ रंग – गडद लाल.

मेष :- (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)चंद्राचा शनीशी लाभयोग संयमाची परीक्षा पाहील. आज वर्ज्य दिवस असल्याने महत्त्वाचे निर्णय टाळावेत. खर्चात वाढ होईल. धार्मिक वाचन, जप-उपासनेसाठी उत्तम दिवस आहे. उत्तरार्धात मानसिक शांतता लाभेल.

वृषभ :- (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)चंद्र तुमच्या राशीत प्रवेश करीत आहे. अचानक घडामोडी संभवतात. आर्थिक व्यवहारात सावधगिरी आवश्यक आहे. मित्रांकडून मदतीचा हात पुढे येईल. भागवत एकादशीमुळे सात्त्विक वृत्ती वाढेल.

मिथुन :- (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)आज कामात एकाग्रता कमी राहील. अनावश्यक बोलणे टाळा. चंद्र-हर्षल युतीमुळे विचारांमध्ये अस्थिरता राहील. अध्यात्मिक कार्यात मन रमविल्यास दिवस सुलभ जाईल.

कर्क :- (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)लाभस्थानातील चंद्रामुळे जुन्या प्रयत्नांचे फळ मिळेल. मात्र वर्ज्य दिवस असल्याने नवीन सुरुवात करू नका. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. भावंडांशी संवाद वाढेल.

सिंह :- (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)नोकरी व व्यवसायात जबाबदारी वाढेल. वरिष्ठांशी मतभेद टाळावेत. खर्च नियंत्रणात ठेवा. चंद्र लाभ नेपच्यूनमुळे कल्पकतेला वाव मिळेल.

कन्या :- (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)आज संयम व शिस्त आवश्यक आहे. प्रवास शक्यतो टाळावा. आरोग्याकडे लक्ष द्या. अध्यात्मिक विचार मनाला स्थैर्य देतील. उत्तरार्धात परिस्थिती सुधारेल.

तुळ :- (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)अनुकूल शनीमुळे दीर्घकालीन योजनांवर विचार कराल. भागीदारी व्यवहारात स्पष्टता ठेवा. धार्मिक विधींसाठी वेळ द्याल. मन शांत राहील.

वृश्चिक :- (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)आज भावनिक अस्थिरता जाणवेल. निर्णय पुढे ढकललेले बरे. चंद्र-हर्षल युतीमुळे अचानक बातम्या मिळू शकतात. उत्तरार्ध थोडा अनुकूल आहे.

धनु :- (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. भागवत एकादशीचा लाभ मिळेल. खर्च वाढण्याची शक्यता आहे. जुनी येणी वसूल होतील. मन प्रसन्न राहील.

मकर :- (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)आज संयमाने वागा. कामाचा ताण जाणवेल. चंद्राचा लाभयोग आर्थिक स्थैर्य देईल. कुटुंबात धार्मिक वातावरण राहील.

कुंभ :- (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)आज वर्ज्य दिवस असल्याने नवीन काम टाळा. मित्रांकडून सल्ला मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. अध्यात्मिक चर्चा लाभदायक ठरेल.

मीन :- (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)चंद्र लाभ नेपच्यूनमुळे अंतर्मुखता वाढेल. सर्जनशील कामात यश मिळेल. नोकरीत प्रशंसा होईल. दिवस शांततेत जाईल.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – .ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

2 Comments
  1. […] आजचे राशिभविष्य बुधवार, ३१ डिसेंबर २०… […]

  2. […] आजचे राशिभविष्य बुधवार, ३१ डिसेंबर २०… […]

Don`t copy text!