मराठी सुपरस्टार अंकुश चौधरीची तब्बल १५ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर एण्ट्री 

0

मुंबई – सही रे सही या नाटकापासून मराठी रसिकांच्या मनावर राज्य करणारा मराठीतील सुपरस्टार अंकुश चौधरी तब्बल १५ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर एण्ट्री घेणार आहे.स्टार प्रवाह वर मी होणार सुपरस्टार’ या डान्स रिअलिटी शोमध्ये अंकुश सुपर जजची जबाबदारी पार पाडणार आहे. हा शो स्टार प्रवाह वर येत्या २१ २१ ऑगस्टपासून सुरु होतोयं

संपूर्ण महाराष्ट्रातलं टॅलेण्ट या डान्सच्या मंचावर अवतरणार आहे. त्यामुळे कोण स्पर्धक सुपरस्टार होण्याचं स्वप्न पूर्ण करणार याची रसिकांना उत्सुकता असणार आहे. नृत्याचे विविध प्रकार तितक्याच हटके पद्धतीने या डान्स रिअलिटी शो मध्ये सादर होणार आहेत. त्यामुळे स्पर्धा अटीतटीची आहे. या डान्स रिअलिटी शो च्या स्पर्धकांमधून सुपरस्टार निवडण्याची जबाबदारी अंकुशच्या खांद्यावर आहे.

या ग्रॅण्ड रिअलिटी शोविषयी सांगताना अंकुश म्हणाला, ‘पंधरा वर्षांनंतर पुन्हा एकदा छोट्या पडद्याकडे वळताना मनस्वी आनंद होत आहे आणि विशेष म्हणजे महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी असलेल्या स्टार प्रवाहसोबत पहिल्यांदाच जोडला जाणार आहे, आणि जजची भूमिकाही पहिल्यांदाच पार पाडतोय. डान्स हा माझ्या अतिशय आवडीचा विषय आहे. या शोमध्ये जरी मी जज असलो तरी मी टीव्हीसमोर बसलेल्या प्रेक्षकांच्या प्रतिनिधीची जबाबदारी पार पाडणार आहे. फरक एवढाच असेल की प्रेक्षक या कार्यक्रमाचा आनंद घरबसल्या घेतील आणि मी प्रत्यक्ष घेईन. मी होणार सुपरस्टार हा कार्यक्रम नवी ऊर्जा घेऊन येणार आहे. पुन्हा एकदा तीच उर्मी आणि तोच उत्साह या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनुभवायला मिळेल. त्यामुळे मी या शोसाठी प्रचंड उत्सुक आहे. 

 
मी होणार सुपरस्टार २१ ऑगस्टपासून दर शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता रसिकांना स्टार प्रवाहवर. बघता येणार आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.