नाशिक जिल्ह्यात १५ डिसेंबर पासून गोवर प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम

0

नाशिक,१३ डिसेंबर २०२२ –जिल्ह्यात गोवरचा प्रादुर्भाव जाणवत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य विभागाकडून खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान जिल्ह्यात २० हून अधिक गोवरचे रुग्ण आढळले.या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत नाशिक जिल्ह्यातील शहरात व ग्रामीण भागात सर्व आरोग्य संस्थान मार्फत येत्या १५ डिसेंबर ते २५  डिसेंबर दरम्यान गोवर प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अमिता मित्तल यांच्या मार्गदर्शनाने व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ हर्षल कुमार नेहेते यांच्या सनियंत्रणामध्ये ही मोहीम राबवली जाणार आहे यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ११२ प्राथमिक आरोग्य केंद्र व ५९२ आरोग्य उपकेंद्र स्तरावरून ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

यामध्ये डिसेंबर महिन्यात गोवर प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस तर १५ ते २५ जानेवारी या कालावधीत दिल्या जाणार असून  १० दिवसाच्या दरम्यान दुसरा डोस देण्यात येणार आहे त्यां संदर्भात नियोजन आखण्यासाठी शहर जिल्ह्यातील ९ ते १२ आणि १६ ते २४ वयोगटातील मुला मुलींची माहिती संकलित करण्याचे काम सध्या सुरू आहे, उपलब्ध माहितीनुसार ग्रामीण भागातील पहिला डोस २७७८ व दुसरा डोस २६८४ लाभार्थींना गोवर प्रतिबंधात्मक लस देण्यात येणार आहे जिल्ह्यात ५१८ लसीकरण सत्राचे नियोजन करण्यात आलेले आहे.

तरी सर्व नागरिकांनी आपल्या घरातील आपल्या परिसरातील नियमित लसीकरणापासून वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांनी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधून गोवर च्या प्रतिबंधात्मक लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांना गोवरची लस टोचून घ्यावी व जिल्ह्यातील लसीकरण हे शंभर टक्के पूर्ण करणे कामी सर्वांनी आरोग्य विभागास करावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती असीमा मित्तल तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ हर्षल नेहते जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ कैलास भोये,अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सचिन खरात,डॉ युवराज देवरे,यांनी केले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!