“मीरा रागवायचे नाटक करते आहे” – उत्कर्ष

0

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल एक सदस्य घराबाहेर पडला तर एका सदस्याची घरामध्ये एंट्री झाली. आविष्कारला काल घराबाहेर पडावे लागले तर बिग बॉस मराठीच्या घरामध्ये झाली सिझनची दुसरी वाईल्ड कार्ड एंट्री नीथा शेट्टी – साळवी. नव्या सदस्याच्या येण्याने घरातील समीकरण किती बदलणार ? हे तर हळूहळू समजेलच पण, घरातील सगळ्यात स्ट्रॉंग टीम उत्कर्ष, मीरा, गायत्री, जयमध्ये गैरसमजामुळे दुरावा आल्याचा दिसतो आहे.

स्नेहाच्या येण्याने असे झाले असावे का की चुगलीमुळे की आधीपसूनच याची सुरुवात झाली होती ? त्याचे नक्की कारण काय असेल हे जेव्हा ते स्पष्टपणे बोलतील तेव्हा कळेलच. काल आलेल्या चुगलीमुळे गायत्रीला धक्का बसला आहे आणि तिचे डोळे आता उघडले आहेत असे तिने महेश मांजरेकर यांना बोलताना सांगितले.आज घरामध्ये नक्की काय काय घडले जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा

आज उत्कर्ष, स्नेहा आणि जय मीरा आणि गायत्रीवरुन चर्चा करताना दिसणार आहेत. जय उत्कर्ष आणि स्नेहाला म्हणाला, गायत्रीने यामध्ये एक मूर्खपणा केला मी तुला सांगतो ना. उत्कर्षचं म्हणण पडलं सर मागच्या वेळेस बोलले होते खड्डा तुम्ही स्वत:साठी खोदता आहेत लक्षात घ्या. जय म्हणाला आता तिने काय केलं सरांनी सांगितले तू फेन्सवर बसू नको तू एकतर लेफ्टला उडी मार नाहीतर राईटला उडी मार, या बाईने तिकडेच उडी मारली. उत्कर्षचे म्हणणे आहे हे शांत झालं पाहिजे. मीराचा वेगळाच गेम सुरू आहे जय म्हणाला तिला सांग गेम तिच्याकडेच ठेव, हा गेम इकडे चालणार नाही. उत्कर्ष म्हणाला ती म्हणते आहे मी अॅक्टिंग करते आहे. परवा ती मला म्हणाली मी रागवायची अॅक्टिंग करते आहे. मी माझा वेगळा गेम खेळणार आहे, पण माझा तुला पाठिंबा असेल. पण आता असं झाला आहे तू जर अॅक्टिंग करते आहेस तर मला सांग ना, मला कळणार कसं ?

नक्की मीराच्या मनामध्ये आहे तरी काय ? कोणता गेम खेळते आहे मीरा ? काय सांगायचे आहे तिला उत्कर्षला ? जसजसे दिवस पुढे जातील तसं हे देखील कळेलच. अजून काय काय घडलं बिग बॉस मराठीच्या घरात ?

कोण होणार नॉमिनेट ? कोण होणार सेफ ?

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज रंगणार आहे नॉमिनेशन कार्य. यावेळेसच नॉमिनेशन कार्य जरा इंटरेस्टिंग असणार आहे. कारण देखील असंच आहे… मागील आठवड्यात बर्‍याच गोष्टी घडून गेल्या आहेत, जे अजूनही बरेच सदस्य विसरले नाहीयेत. कुठेतरी त्याचे पडसाद आजच्या कार्यावर पडणार हे नक्की. कोणता सदस्य कोणाला घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट करणार ? आणि कोण सेफ होणार ? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.

नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉस यांनी सांगितले, “आज बिग बॉसच्या घराला साजेस असं तोरण लागणार आहे. ज्या सदस्यांचे फोटो तोरणावर नसतील ते सदस्य नॉमिनेट होतील.”

बघूया आज कोण कोणाला करणार नॉमिनेट आणि कोण होणार सेफ. तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा.कलर्स मराठीवर.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.