नाशिकच्या शैक्षणिक क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल – IIBHM व MET यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे करिअर-केंद्रित अभ्यासक्रम लाँच
नाशिक दिनांक : २७ मे २०२५ – MET News नाशिकच्या शैक्षणिक इतिहासात एक नवे पर्व सुरु झाले आहे. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बिल्डटेक अँड हेल्थकेअर मॅनेजमेंट (IIBHM) आणि MET’s Asian Management Development Center यांच्या संयुक्त विद्यमाने, नाशिकमध्ये प्रथमच जागतिक स्तरावर करिअर उभारणारे चार अत्याधुनिक पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम्स (PGPs) सुरू करण्यात आले आहेत.
या अभ्यासक्रमांचा उद्देश नाशिकसारख्या प्रगतिशील शहरातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण, ट्रेंडिंग कौशल्यं आणि जागतिक नोकरी संधी मिळवून देणे आहे. या उपक्रमाचा शुभारंभ २४ मे रोजी MET चे प्रमुख श्री. समीर भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी IIBHM चे प्रमुख श्री. नितीन पाटील व शैलजा पाटील उपस्थित होते.
🧑🎓 उपलब्ध अभ्यासक्रमांची वैशिष्ठ : MET News
✅ PGP in Artificial Intelligence & FinTech
कोणासाठी? – कॉम्प्युटर सायन्स व IT शाखेतील पदवीधर
मुख्य वैशिष्ट्ये: डेटा सायन्स, AI आणि FinTech वर आधारित प्रशिक्षण. BFSI व IT क्षेत्रात जागतिक करिअरची दारे उघडणारा अभ्यासक्रम.
✅ PGP in Construction Management
कोणासाठी? – सिव्हिल आणि मेकॅनिकल अभियांत्रिकी पदवीधर
मुख्य वैशिष्ट्ये: ग्रीन कन्स्ट्रक्शन, प्रोजेक्ट मॅनेजमेंट यांचा समावेश. भारत, दुबई, कुवेत, कतार, सौदी अरेबियामध्ये करिअर संधी.
✅ PGP in Healthcare Management
कोणासाठी? – सायन्स शाखेतील पदवीधर
मुख्य वैशिष्ट्ये: हॉस्पिटल अॅडमिनिस्ट्रेशन, हेल्थ सिस्टीम्स आणि कन्सल्टिंगवर आधारित अभ्यासक्रम. ग्लोबल हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये प्रचंड मागणी.
✅ PGP in Real Estate Management
कोणासाठी? – सर्व शाखांतील पदवीधर
मुख्य वैशिष्ट्ये: RERA, व्हॅल्युएशन, अर्बन डेव्हलपमेंटसह रिअल इस्टेट लॉचे प्रशिक्षण. मेट्रो शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात नोकरी संधी.
🎯 विशेष वैशिष्ट्ये:
100% प्लेसमेंट सपोर्ट
इंडस्ट्री लिंक्ड कोर्सेस
प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग
आंतरराष्ट्रीय स्तरावरील संधी
IIBHM संस्थापकांचा १५+ वर्षांचा अनुभव भारत, गल्फ आणि युकेमध्ये यशस्वी प्लेसमेंटमध्ये मोलाचा ठरला आहे. आता हेच शिक्षण नाशिकमध्ये सहज उपलब्ध होत आहे, जे विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी ठरू शकते.
📌 प्रवेश प्रक्रिया सुरु | जुलै २०२५ बॅचसाठी अर्ज सुरू
📍कॅम्पस: MET Bhujbal Knowledge City, गोवर्धन, नाशिक
🌐 अधिक माहितीसाठी भेट द्या: www.iibhm.in
📞 संपर्क: ७७२००७२४००