आगामी नाशिक महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी मनसेने सुरु केली तयारी

0

नाशिक – आगामी नाशिक महानगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मनसेने तयारी सुरु केली आहे. यासाठी नाशिक मनपातील सर्व ३१ प्रभागा साठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना  शाखा अध्यक्षांची  नियुक्त्या करणार आहे. या संदर्भात मनसेचे युवानेते अमित राजसाहेब ठाकरे यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वरिष्ठ नेते दिनांक २६ ते २९ ऑगस्ट २०२१ दरम्यान नाशिक दौऱ्यावर येत आहेत.

या दौऱ्यात नाशिक मधील सहाही विभागांच्या इच्छुक शाखा अध्यक्षांशी स्वतः अमित ठाकरे यांच्यासह मनसेचे वरिष्ठ नेते हितगुज करणार आहेत. नाशिक पूर्व विभागाच्या (पंचवटी व नाशिकरोड) बैठका २७,२८ व २९ ऑगस्ट २०२१ दरम्यान यशवंत लॉन्स, छत्रपती संभाजी नगर रोड, पंचवटी येथे सकाळी ११.०० वाजे पासून सुरु होणार आहेत.

नाशिक मध्य विभागाच्या बैठका २७,२८ व २९ ऑगस्ट २०२१ दरम्यान राजगड कार्यालय, ठक्कर बझार, नवीन सीबीएस येथे सकाळी ११.०० वाजे पासून सुरु होणार आहेत. तर नाशिक पश्चिम विभागाच्या (सातपूर व नवीन नाशिक) बैठका २७,२८ व २९ ऑगस्ट २०२१ दरम्यान माऊली लॉन्स, डीजीपी नगर २, कामटवाडे, नवीन नाशिक येथे सकाळी ११.०० वाजे पासून ते पूर्ण दिवस होणार आहेत.

या वेळी अमित राजसाहेब ठाकरे यांच्यासह बाळासाहेब नांदगांवकर, अनिल शिदोरे, शिरीष सावंत, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, किशोर शिंदे, योगेश परुळेकर, अमय खोपकर, दिलीप कदम, योगेश खैरे, अविनाश जाधव हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. ज्या महाराष्ट्र सैनिकांना संघटनेत शाखा अध्यक्ष म्हणून काम करायची ईच्छा असेल त्या सर्वांनी त्यांच्या विभागाच्या बैठकीच्या ठिकाणी उपस्थित राहण्याचे आवाहन शहराध्यक्ष अंकुश पवार यांनी केले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.