मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पासून तीन दिवस नाशिक दौऱ्यावर 

0

नाशिक,दि,२३ जानेवारी २०२५ –महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज पासून तीन दिवस नाशिक दौऱ्यावर येत आहेत.विधानसभा निवडणुकी नंतर राज ठाकरे पुन्हा एकदा मैदानात उतरणार असून येणाऱ्या महापालिका निवडणुकी संदर्भात ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. राज ठाकरेंच्या या दौऱ्यामुळे मनसे कार्यकर्त्यातमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.आज सकाळी ९:३० वाजता राज ठाकरे यांचे नाशिकच्या हॉटेल SSK येथे आगमन होणार आहे.त्यानंतर ते पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील.

नाशिक हा एकेकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बालेकिल्ला होता. अंतर्गत गटबाजीमुळे कार्यकर्त्यांमध्ये पसरलेली नाराजी व आगामी मनपासह, जिल्हा परिषद व इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाला ऊर्जा देण्यासाठी राज ठाकरे मैदानात उतरणार आहे. २०१२ च्या महापालिका निवडणुकीत नाशिककरांनी तब्बल ४० नगरसेवक निवडून दिले होते. त्यामुळे २०१२ ते २०१७ या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महापौर होता. राज ठाकरे यांच्या पुढाकाराने बोटॅनिकल गार्डन, बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालय, ट्राफिक चिल्ड्रन पार्क, गोदा पार्क, रिंग रोड आदी महत्वाचे प्रकल्प मार्गी लागले होते. शहराचे सुशोभीकरणावर त्यांनी विशेष लक्ष देऊन उड्डाणपुलाच्या खाली देखील सुशोभीकरण करून घेतले. याच विकास कामांच्या जोरावर २०१७ ची महापालिका निवडणूक आपण पुन्हा जिंकू असे वाटत असताना पक्षातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली.याच काळात पक्षातील अनेक मोठे नेते पक्षाला रामराम ठोकून बाहेर पडले. त्यामुळे राज ठाकरे अंतर्गत गटबाजी संपवणार का याकडे मनसैनिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!