नाशिक वरून जाणार मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वे

0

नाशिक –  मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर बुलेट ट्रेनचा प्रकल्प प्रस्तावित असून समृद्धी महामार्गाला लागूनच मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वे  प्रकल्पाला नाशिक जिल्ह्याचे संपूर्ण सहकार्य आहे.या प्रकल्पाचा मार्ग सिन्नर व इगतपुरी तालुक्यातून जाणार असल्याने जिल्ह्याला या प्रकल्पाचा अधिकाधिक फायदा होण्यासाठी  त्याचा सूक्ष्म आराखडा सादर करण्याच्या सूचना, राज्याचे अन्न नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत .

Mumbai-Nagpur High Speed __Railway Meeting-min

जिल्हाधिकारी कार्यालयात ‘मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वे कॉरीडॉर भूसंपादनाची’ प्राथमिक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ बोलत होते. यावेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार ॲ माणिकराव कोकाटे, आमदार हिरामण खोसकर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, उपजिल्हाधिकारी ज्योती कावरे, नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Mumbai-Nagpur High Speed __Railway Map-min

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, नाशिक जिल्हा नेहमी विकासाला प्राधान्य देणारा आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा नाशिकला फायदा कसा होईल यासाठी नियोजन करण्यात यावे. इगतपुरी व सिन्नर या तालुक्यामधून हा प्रकल्प जात असल्याने यामध्ये समृध्दी महामार्गाव्यतिरिक्त कोणत्या गावातील जमीन भूसंपादन करणे आवश्यक आहे, याबाबत निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकारी व संबधित तालुक्यांचे लोकप्रतिनिधी समवेत बैठक घेण्याबाबतची सूचना, पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी संबंधितांना दिली आहे.

मुंबई-नागपूर हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर बुलेट ट्रेनचा मार्ग नाशिक जिल्ह्यातील कोणकोणत्या मार्गावर जाणार याचे सूक्ष्म नियोजन नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांचे  प्रतिनिधींनी सादर करावे. तसेच जमीनी भूसंपादन करतांना अडचणी निर्माण होवू नये यासाठी पर्यायांची उपलब्धी सादर करावी, अशा सूचना यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबधितांना केली आहे.

मुंबई-नागपूर हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर बुलेट ट्रेन प्रकल्पातील तांत्रिक समस्यांवर चर्चा करण्यासाठी लवकरच संबंधित तालुक्यातील लोकप्रतिनिधी, अधिकारी नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांचे प्रतिनिधी समवेत बैठक घेण्यात येईल. तसेच जमीनीचे भूसंपादन करतांना शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्यात येणार असल्याचे , जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.