डॉ.राहुल रमेश चौधरी
बध्दकोष्ठता,मूळव्याध हा समाजात हमखास ऐकला जाणारा विषय आहे.अनेक वेळा बध्दकोष्ठता मुळे जो त्रास होतो त्याचेच पुढे मूळव्याधात रुपांतर होते.बिघडलेल्या पचनसंस्थेमुळे सतत शौचास जोर करावा लागणे परिणामत:त्याची परिणती मूळव्याध,भगंदर,परिकर्तिका(शौच् याच्या जागी चिरा जाणे) अश्या तत्सम आजारात होते.बऱ्याच वेळॆला बध्दकोष्ठता म्हणजेच मूळव्याध असे समजले जाते व विनाकारण तेथे मूळव्याधच्या व तत्सम आजाराची योजना केली जाते ,बऱ्याच वेळा शस्त्रक्रिया देखील केली जाते.वरील आजाराबाबत अनेक गैरसमज समाजात आहेत.
वरीलपैकी प्रत्येक आजाराला मूळव्याध असेच संबोधले जाते.हे सर्व समज गैरसमज दूर करण्याकरीता या आजारासंदर्भात आपण आज माहीती घेवूयात.
सुरुवातीला आपण बध्दकोष्ठता,मूळव्याध,परिकर्ति का,भगंदर आदी संज्ञा चा अर्थ बघूयात.बध्दकोष्ठता म्हणजे सामन्य भाषेत पोट योग्य रितीने साफ न होणे.मूळव्याध याचा सामान्य भाषेत अर्थ म्हणजे शौच्याच्या जागी मांसांकुर तयार होणे.भगंदर म्हणजे शौच्याच्या जागी बाहेरून आतल्या बाजूने जंतूसंसर्ग करून मार्ग तयार करणे.परिकर्तिका म्हणजे शौच्याच्या जागी चिरा जाणे व त्यातून रक्तस्त्राव होणे.या अनेक गुदगत आजारांपैकी महत्वाच्या आजाराची आपण सामान्य भाषेत परिभाषा बघितली.आता त्याचे आपण विस्ताराने वर्णन बघूयात.

वरील आजारांच्या लक्षणाबाबत बघूयात.
१.बध्दकोष्ठता-
शौचाला कठिण होणे,शौचास जोर करावा लागणे,शौचाला आधी कठिण व नंतर व्यवस्थित होणे,शौचास घाणेरडा वास येणे,शौचास जाण्याआधी भरपूर गॅस बाहेर पडणे,सतत कोरडे ढेकर येणे,पोट दुखणे,शौच्याच्या जागी दुखणे,शौचास भरपूर वेळ लागणे,शौचास कधी घट्ट होणे-कधी पातळ होणे,शौचास न होणे,बरेच दिवस शौचास न होणे,शौचास जावून आल्यानंतर पाय दुखणे इत्यादी लक्षणे सामान्यत: दिसतात.
२.मूळव्याध-
मूळव्याधात शौचास जोर करावा लागणे,शौच्याच्या जागी आग होणे,शौच्याच्या वेळी रक्त पडणे,शौचास जावून आल्यानंतर थकवा जाणवणे,शौच्याच्या जागी बाहेरून मांसाचे कोंब तयार होणे,शौच्याच्या जागेतून शौच्याच्या वेळी कोंब बाहेर येणे शौचानंतर पुन्हा आत जाणे,बाहेर आलेले मांसाचे कोंब बाहेर आल्यानंतर पुन्हा भरपूर वेळाने आत जाणे,बाहेर आलेले मांसाचे कोंब बाहेरच राहणे,किंवा शौचाची जागा बाहेरच येणे,शौचास करताना सतत भीती वाटणे.शौचाची जागा दुखणे-लाल होणे-सूज येणे,शौचास होताना टोचल्यासारखे वाटणे अश्या स्वरूपाची लक्षणे मूळव्याधात दिसतात.
३.भगंदर-
भगंदर या आजारात आधी शौच्याच्या जागी वारंवार पिटीका निर्माण होतात.त्या पीटीकातून पू ,रक्त येणे,ही अवस्था पुढे सरकत सरकत शौच्याच्या जागी आतून बाहेर किंवा बाहेरून आत जंतूसंसर्ग होवून मार्ग तयार होणे व त्या मार्गातून सतत पू व रक्त बाहेर पडणे,व अश्या प्रकारचे अनेक मार्ग शौच्याच्या जागी तयार होणे,शौचास करताना भीती वाटणे,शौचाची जागा सतत दुखणे,त्याजागी सूज येणे.
४.परिकर्तिका-
परिकर्तिका म्हणजे शौच्याच्या जागी चिरा पडणे,शौच्याच्या वेळी घाम येणे-आग होणे-वेदना होणे,शौचास भीती वाटणे,शौच्याच्या जागेतून रक्त पडणे,बसण्यास त्रास होणे इत्यादी.
याव्यतिरिक्त शौच्याच्या जागी पिटीका तयार होणे,जंतूसंसर्ग होणे आदी अनेक आजार उत्पन्न होतात.
पथ्यापथ्य-
१.सतत तिखट खाणे,मसालेदार पदार्थ खाणे,मसाल्याच्या भाज्या खाणे
२.तेलकट पदार्थ खाणे,अतिमद्यपान करणे,तंबाखू-विडी-सिगारेट यांचे सेवन करणे.
३.शौच लघवी चा वेग आलेला असताना त्यास रोखणे
४.आंबवलेले ,बेकरीचे पदार्थ खाणे
५.लोणचे,चटण्या,वातुळ पदार्थ खाणे
६.अत्यधिक प्रवास करणे,सतत कठिण भागावर बसणे,अति प्रमाणात संभोग करणे,शौचास सतत जोर लावणे
७.स्त्रीयांमध्ये वारंवार गर्भस्त्राव,गर्भपात होणे.
या कारणास्तव वरील आजार निर्माण होतात.
उपचार-
वरील आजारांवरील उपचार आपण बघूयात
बऱ्याच वेळेला रुग्णाला खूप दिवसांच्या बध्दकोष्ठतेमुळे वाटते की आपणास हे त्रास होत आहे,वास्तविक पाहता रुग्णाची पचन संस्था सुधारली की बऱ्याच वेळा हे आजार सुरुवातीला च बरे होतात.अनेक रुग्ण परस्पर मेडिकल वर पोट साफ होण्याचे औषधे घेतात,वारंवार पोट साफ होण्याचे औषधे घेतल्याने देखील रुग्णांना या वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागते.जर तुमची पचनसंस्था च योग्य नसेल तर तुम्हाला या आजारांना सामोरे जावेच लागते व आजाराने शेवट गाठल्यास शस्त्रक्रियेशिवाय पर्याय राहत नाही.लहान आतडे मोठे आतडे याचे काम सुधारणे गरजेचे ठरते.याचे काम म्हणजे पोटाकडून आलेले अन्न घेणे ,पचवणॆ,वेगवेगळे करणे व सोडून देणे या प्रक्रियेत जेव्हा बाधा निर्माण होते तेव्हा वरील आजार निर्माण होतात.या आजाराकरीता उपचारांचा एक साचा आहे त्यानुसार गेल्यास आपल्याला शस्रक्रिया टाळता येवू शकते.
१.पथ्यापथ्य
२.व्यायाम
३.औषधोपचार
४.उपयुक्त पंचकर्म
५.अपुनर्भव उपचार
६.शस्त्रक्रिया
यात पहिल्या मुद्द्याचा म्हणजे पथ्यापथ्याचा म्हणजेच काय खावे काय खावू नये याचे विवेचन वर बघितले आहे.
दुसऱ्या मुद्द्यात योग्य व्यायाम,चालणे,योगासने करणे या गोष्टींचा समावेश होतो.
तिसरा मुद्दा औषधोपचाराचा यात नागरमोथा,शुंठी,पाठा,नागकेशर,बे लचुर्ण,हिरडा चूर्ण अश्या वेगवेगळ्या औषधांचा वापर करून आजार बरे केले जातात.
चौथा मुद्दा उपयुकत पंचकर्म यामध्ये तेलाचे बस्ती,जळू लावणे,रक्तमोक्षण,विरेचन या प्रक्रियेचा समावेश होतो.याशिवाय औषधी काढ्याचा अवगाह स्वेद म्हणजेच दुखणे कमी करण्यासाठी काढ्यांचे शेक दिले जातात.
पाचवा मुद्दा अपुनर्भव उपचार म्हणजे बरा झालेला आजार होवूच नये याकरीता वेगवेगळे रसायन औषधे दिली जातात.
वरील उपायापैकी काहीच लागू होत नसल्यास पर्याय नसल्यास शस्रक्रियेशिवाय पर्याय नसतो.पण योग्य उपचार चिकाटीने केल्यास,जिभेवर नियंत्रण ठेवल्यास व्यवस्थित रुग्ण बरा होवू शकतो.

संपर्क- औदुंबर आयुर्वेद चिकित्सालय
मोबाईल -९०९६११५९३०