नाशिक – मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर बुलेट ट्रेनचा प्रकल्प प्रस्तावित असून समृद्धी महामार्गाला लागूनच मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला नाशिक जिल्ह्याचे संपूर्ण सहकार्य आहे.या प्रकल्पाचा मार्ग सिन्नर व इगतपुरी तालुक्यातून जाणार असल्याने जिल्ह्याला या प्रकल्पाचा अधिकाधिक फायदा होण्यासाठी त्याचा सूक्ष्म आराखडा सादर करण्याच्या सूचना, राज्याचे अन्न नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत .

जिल्हाधिकारी कार्यालयात ‘मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वे कॉरीडॉर भूसंपादनाची’ प्राथमिक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ बोलत होते. यावेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार ॲ माणिकराव कोकाटे, आमदार हिरामण खोसकर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, उपजिल्हाधिकारी ज्योती कावरे, नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे प्रतिनिधी उपस्थित होते.
