मुंबई | २६ मे २०२५ — Mumbai Rain News यंदा मान्सूनने महाराष्ट्रात विक्रमी लवकर हजेरी लावली असून, अवघ्या १२ दिवस आधी म्हणजे २६ मे रोजीच मुंबईत मान्सून दाखल झाला. भारतीय हवामान खात्याने (IMD) मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. सोमवारी सकाळी ऑरेंज अलर्ट जारी केल्यानंतर दुपारी १२:३८ वाजता परिस्थिती अधिक गंभीर होत गेल्यामुळे रेड अलर्ट जाहीर करण्यात आला.
मुंबईमध्ये सकाळपासूनच मुसळधार पावसाचा जोर कायम असून, अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. दादर, हिंदमाता, सायन सर्कल, वरळी, केम्प्स कॉर्नर, जे. जे. मार्ग आणि कुर्णे चौक आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. काही ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडल्यामुळे नागरिकांना वाहतुकीत मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
🚇 मेट्रो-3 स्थानकात पाण्याचा कहर: आचार्य अत्रे स्थानकात पाणी शिरले Mumbai Rain News
मुंबईतील नव्याने सुरु झालेल्या मेट्रो-३ (Aqua Line) प्रकल्पाची स्थिती पहिल्याच पावसात उघडी पडली आहे. वरळीतील आचार्य अत्रे भुयारी मेट्रो स्थानक जलमय झाले असून, छतामधून पाण्याच्या धारांचा मारा झाल्याने संपूर्ण स्थानकात पाणी शिरले. त्यामुळे सरकते जिने, सुरक्षा उपकरणे, चेकिंग पॉईंट्स यांचं मोठं नुकसान झालं आहे. लाखोंच्या किंमतीचे उपकरण निकामी झाले असून, काही भाग भंगारात टाकण्याच्या स्थितीत आले आहेत.
मेट्रो प्रशासनाने याबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले की, वरळीतील भिंतीचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्यामुळे संरक्षक भिंत कोसळली आणि पाणी शिरले. हे काम १० जूनपर्यंत पूर्ण होणार होते. मात्र, मान्सून लवकर आल्यामुळे अंदाज चुकला.
⚠️ मुंबईकरांसाठी महत्त्वाचे इशारे:
अनावश्यक प्रवास टाळा
सखल भागांपासून दूर रहा
झाडांखाली उभं राहू नका
विद्युत खांबांपासून अंतर ठेवा
घराबाहेर पडताना छत्री/रेनकोट वापरा
लहान मुलं व वृद्धांची विशेष काळजी घ्या
🌧️ पावसाचा विक्रमी आकडा:
कुलाबा वेधशाळा: १३५.४ मिमी
सांताक्रूझ वेधशाळा: ३३.५ मिमी
मे २०२५ मधील एकूण पावसाची नोंद: २९५ मिमी (मे १९१८ चा विक्रम मोडला)
📢 प्रशासनाचे आवाहन:
हवामान खात्याच्या इशाऱ्यांनुसार पुढील काही दिवस मुंबईत अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सुचनांवर विश्वास ठेवावा आणि प्रशासनास सहकार्य करावे.
Acharya Atre Metro station drowns in first rain. This is the proof of incomplete, substandard work. Inaugurated in a hurry, media blocked from exposing the truth. This is where taxpayers’ money is going? Shameful cover-up. #MumbaiRains #AccountabilityNow pic.twitter.com/pwOkQhnmh7
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 26, 2025