नाशिक – नाशिकच्या सातपूर येथील भाजप मंडल अध्यक्ष अमोल इघे यांची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.आज सकाळी त्यांच्यावर धारधार शस्त्राने वार करण्यात आले. राजकीय पूर्ववैमनस्यातून हत्या झाली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. नाशिक शहर या हत्येच्या घटनेनं हादरल असून अवघ्या चार दिवसात नाशिकमधील ही तिसरी हत्येची घटना आहे.
मिळालेल्या माहिती नुसार अमोल इघे यांची युनियनच्या वादातून आज सकाळी हत्या झाली असे बोलले जात आहे. आज सकाळी त्यांच्यावर धारदार शस्राने वार करण्यात आले.जखमी अवस्थेत त्यांना शासकीय हाॅस्पिटलमध्ये नेण्यात आले होते परंतु उपचार सुरु असतांनाच त्यांचा मृत्यू झाला.घटना समजताच पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी दाखल झाला असून पोलीस तपास सुरु आहे.काही वेळातच पोलीस या बाबत अधिक माहिती देणार असल्याचे समजते आहे.
पंचवटी पाठोपाठ सातपूर येथील हत्येने खळबळ उडाली आहे. पंचवटी येथे तीन दिवसात दोन हत्या झाल्याच्या घटना घडल्या, यामुळे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी काही वादग्रस्त पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या आहेत, आगामी काळात महापालिका निवडणूक असून त्या पूर्वीच गुन्हेगारीने डोके वर काढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे