एलन मस्क यांनी ट्रम्प प्रशासनाची साथ सोडली
एलन मस्कडोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार पदाचा देखील दिला राजीनामा
वॊशिंग्टन,दि,२९ मे २०२५ – Musk quits Trump administration अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू आणि प्रसिद्ध उद्योगपती एलन मस्क यांनी ट्रम्प प्रशासनातून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी विशेष सरकारी कर्मचारी या पदाचा राजीनामा दिला असून, याची माहिती मस्क यांनी त्यांच्या X (पूर्वीचे ट्विटर) हँडलवरून दिली.
मस्क यांनी पोस्टद्वारे लिहिले की, “विशेष सरकारी कर्मचारी म्हणून माझा कार्यकाळ इथे संपतोय. मला ही संधी दिल्याबद्दल राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे आभार.” त्यांनी पुढे स्पष्ट केलं की आता DOGE मिशन वर अधिक लक्ष केंद्रीत करणार आहेत, कारण सरकार चालवण्याचा तो एक संभाव्य मार्ग आहे, असे त्यांचे मत आहे.
सरकारी धोरणांवर नाराजी (Musk quits Trump administration)
एलन मस्क यांनी ट्रम्प यांच्या ‘बिग ब्यूटीफुल’ बिल वर खुली नाराजी व्यक्त केली होती. या बिलात ट्रिलियन डॉलरच्या टॅक्स ब्रेक्स आणि संरक्षण खर्च वाढवण्याचा प्रस्ताव होता, ज्याचा मस्क यांनी विरोध केला होता. हा मुद्दा त्यांच्यातील दुरावा वाढवणारा ठरला, असे तज्ज्ञांचे मत आहे.
टेस्ला विक्री घसरली, गुंतवणूकदार नाराज
दरम्यान, Tesla कंपनीची विक्री सतत घटत आहे. टेस्लाच्या शेअर्समध्येही घसरण सुरू आहे. गुंतवणूकदारांमध्ये असंतोष निर्माण झाला असून, काहींनी मस्क यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अमेरिकेत टेस्लाचा बहिष्कार सुरु झाल्यामुळे या संकटाची तीव्रता वाढली आहे.
एलन मस्क यांची ‘ऑफबोर्डिंग’ प्रक्रिया सुरू
व्हाइट हाउसमधील अधिकाऱ्यांनी सांगितले की, मस्क यांची ऑफबोर्डिंग प्रक्रिया बुधवारी रात्रीपासून सुरू झाली आहे. मागील 130 दिवस मस्क यांनी सरकारी खर्चात कपात, प्रशासन सुधारणा आणि धोरण सल्ला या विषयांवर काम केले होते.
As my scheduled time as a Special Government Employee comes to an end, I would like to thank President @realDonaldTrump for the opportunity to reduce wasteful spending.
The @DOGE mission will only strengthen over time as it becomes a way of life throughout the government.
— Elon Musk (@elonmusk) May 29, 2025
[…] एलन मस्क यांनी ट्रम्प प्रशासनाची साथ … […]
[…] एलन मस्क यांनी ट्रम्प प्रशासनाची साथ … […]