नागपूरच्या सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीत भीषण स्फोट; ९ जणांचा मृत्यू
नागपूर,दि.१७ डिसेंबर २०२३ – नागपूर जवळ सोलार एक्सप्लोसिव्ह या डेटोनेटर आणि इतर स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास कंपनीच्या एका बिल्डिंगमध्ये मोठा स्फोट झाल्याची माहिती आहे. तब्बल नऊ जण या स्फोटात मृत्यू झाला असून अद्यापही अनेकजण कंपनीत अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. मृतांचा आकडा वाढण्याची हि भीती व्यक्त केली जात आहे.
नागपूर अमरावती मार्गावर बाजार गाव येथे ही कंपनीत आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास स्फोट झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. मात्र, या स्फोटात मृतांचा आकडा वाढून ९ झाला आहे. मृतांमध्ये ६ महिला आणि ३ पुरुषांचा समावेश आहे. दरम्यान, सोलार एक्सप्लोसिव्ह बनवणाऱ्या कंपनीत हा स्फोट झाला आहे. तसेच, या स्फोटात अनेक मजूरही गंभीररित्या जखमी झाले आहेत.
अद्यापही अनेकजण कंपनीत अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या घटनास्थळी आमदार अनिल देशमुख उपस्थित आहेत.
नागपूर अमरावती रोडवर बाजार गाव येथे ही कंपनी असून आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. निर्माण झालेले स्फोटक पॅकिंग करण्याचं काम सुरू असताना हा स्फोट झाल्याची माहिती आहे. स्फोट तीव्र क्षमतेचा होता आणि त्यामध्ये तिथे असलेले अनेक मजूर गंभीरित्या जखमी झाले आहेत. या घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची ही माहिती आहे. मात्र पोलीस किंवा प्रशासनाकडून त्याची अद्याप पुष्टी झालेली नाही.