नाशिकमध्ये भीषण अपघात भरधाव कार थेट बंगल्यात घुसली-५ जणांचा मृत्यू

0

नाशिक, दि. ५ जून २०२५ – Nashik Accident News नाशिक जिल्ह्यात बुधवारी रात्री उशिरा घडलेल्या एका भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना नाशिक-कळवण रस्त्यालगत कोल्हापूर फाट्याजवळ सुमारे रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली.

नामपूर येथील भदाण कुटुंबीय नातेवाईकाच्या लग्नसमारंभानंतर परतत असताना, त्यांच्या कारचा चालकाचा ताबा सुटला. भरधाव वेगात असलेली कार (एमएच ४१ बीई ५४४३) थेट रस्त्यालगत असलेल्या विठोबा शंकर अहेर यांच्या बंगल्यावर आदळली. धडक इतकी जोरदार होती की बंगल्याबाहेरचा सिमेंटचा खांबही वाकून गेला.

अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे: (Nashik Accident News)
शैला वसंत भदाण (६२) – नामपूर
सरला भालचंद्र भदाण (५०) – नामपूर
खालिक मेहमूद पठाण (५०) – चालक, नामपूर
माधवी मेतकर (३१) – देवळा
त्रिवेणी मेतकर (४) – माधवी यांची मुलगी, देवळा

गंभीर जखमी:
भालचंद्र भदाण (५२) – नामपूर
उत्कर्ष मेतकर (१२) – देवळा

जखमींवर नाशिकमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे.या अपघातामुळे भदाण व मेतकर कुटुंबांमध्ये शोककळा पसरली असून, संपूर्ण नामपूर आणि देवळा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!