नाशिक, दि. २६ मे २०२५ – Nashik Accident News,नाशिक शहरात अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून,अजून एक हृदयद्रावक घटना घडली आहे. नुकतीच दहावीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळवलेल्या अनुष्का शांताराम निमसे या विद्यार्थिनीचा भरधाव कारच्या धडकेत मृत्यू झाला.उपचारादरम्यान रविवारी (दि. २५) अनुष्काने अखेरचा श्वास घेतला.
अनुष्का ही वडिलांसोबत सोबत गुरुवारी (दि.२२) रोजी सायंकाळी कोणार्क नगर परिसरात किराणा माल खरेदीसाठी गेली होती. यानंतर घरी परताना जत्रा चौक – नांदुरू नाका लिंक रोडवर मागून आलेल्या कारने त्यांच्या दुचाकीला जोडरड धडक मारली.
या धडकेत शांताराम निमसे व अनुष्का हे दोघेजण दुचाकीवरून खाली पडले. शांताराम निमसे यांच्या उजव्या खांद्याला, कमरेला व डोक्यास मार लागुन दुखापत झाली. तसेच मुलगी अनुष्काच्या डोक्यास, हातास आणि दोन्ही पायांना मार लागून गंभीर दुखापत झाली होती. या घटनेनंतर मात्र कार चालक फरार झाला असून या वाहन चालकाचा पोलिसांकडून शोध घेण्याचे काम सुरू आहे.
अपघातातील दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना अनुष्काचा रविवारी (दि.२५) मृत्यू झाला. तिच्या पश्चात आई, वडील आणि लहान बहीण असा परिवार आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रविवारी सायंकाळी तिच्यावर नांदूर अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
घटनेचा तपशील:Nashik Accident News
अनुष्का गुरुवारी (२२ मे) संध्याकाळी आपल्या वडिलांसोबत कोणार्क नगर परिसरात किराणा खरेदीसाठी गेली होती.खरेदी करून परत येत असताना,जत्रा चौक -नांदूर नाका लिंक रोडवर एक भरधाव कार त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली यात अनुष्काचे वडील .शांताराम निमसे (वडील) यांना खांदा, कंबरेला व डोक्याला दुखापतअनुष्का हिला डोक्याला, हाताला व दोन्ही पायांना गंभीर इजा झाली अखेर रविवारी अनुष्काचा उपचारादरम्यान मृत्यू झाला दुचाकीला धडक दिल्यानंतर कार चालक फरार झाला असून, पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.
शोकाकुल वातावरण:
अनुष्कावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच रविवारी तिचा मृत्यू झाला. तिच्या पश्चात आई, वडील आणि लहान बहीण असा परिवार आहे. नांदूर अमरधाम येथे रविवारी सायंकाळी तिचे अंत्यसंस्कार करण्यात आले.
या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघातस्थळी आणि शाळेमध्ये शोकमय वातावरण पसरले आहे.