Nashik :”व्हा हृदयाचे राखणदार”हृदयरोगावर रविवार २७ ऑक्टोबरला परिसंवाद

तज्‍ज्ञ डॉक्‍टर करणार मार्गदर्शन, तरुणाईदेखील मिळणार उपयुक्‍त माहिती

0

नाशिक,दि,२५ ऑक्टोबर २०२७ –रोजचे धकाधकीचे जीवन, सततचा ताणतणाव,व्यावसायिक स्पर्धा यामुळे हृदय विकारांचा धोका वाढतो आहे.तरुणांमध्ये सध्या हे प्रमाण जास्त आढळते आहे.हृदयरोगाची लक्षणे, निदान, उपचार आणि जीवनशैलीतील बदलांचे परिणाम! याविषयीचे सखोल मार्गदर्शन महाराष्ट्रातील दिग्गजांच्या परिसंवादातून कालिदास कलामंदिर सभागृहात ऐकण्याची संधी नाशिककरांना मिळणार आहे. अशी माहिती मॅग्नम ग्रुप ऑफ हॉस्पीटलचे प्रसिध्द हृदयविकार तज्ञ डॉ.मनोज चोपडा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मॅग्नम हार्ट इन्स्टिट्युट व मॅग्नम मल्टिस्पेशालिटी हॉस्‍पिटलचे वतीने रविवार दि.२७ ऑक्टोबर २०२४ रोजी,सकाळी १० वाजता कालिदास कलामंदिर, शालिमार, नाशिक येथे होणार्‍या ‘.व्हा हृदयाचे  राखणदार’ या परिसंवादात नांदेड येथील मानसोपचार तज्ञ डॉ. नंदु एम.मुलमुले, पुणे येथील कार्डिओथोरॅसिक सर्जन डॉ. रणजित जगताप तसेच नाशिक येथील प्रसिध्द हृदयविकार तज्ञ डॉ. मनोज चोपडा यांचा सहभाग असणार आहे.गेल्या १२ वर्षांपासून अखंड सुरु असलेल्या या परिसंवादातून हृदयविकाराचे सर्व पैलू उलगडण्याचे काम मॅग्नम ग्रुप ऑफ हॉस्‍पिटलच्या वतीने सुरु आहे. नाशिकसह जिल्ह्यातील नागरिकही या परिसंवादामध्ये आवर्जून सहभाग नोंदवित असल्याचे डॉ. मनोज चोपडा यांनी सांगितले.

अलीकडील काळामध्ये तरुण वर्गामध्ये हृदयविकाराचे वाढते प्रमाण चिंताजनक बनले आहे. ही गोष्ट लक्षात घेता या परिसंवादातून युवा वर्गालादेखील हृदयविकार टाळण्याबाबत महत्त्वाचे मार्गदर्शन केले जाणार आहे. मानसोपचार तज्‍ज्ञ डॉ.मुलमुले हे मानसिकदृष्या स्‍थिर राहाण्याच्‍या अनुषंगाने उपयुक्‍त माहिती देतील. तसेच डॉ.जगताप या परीसंवादातून मार्गदर्शन करतांना हृदयरोगापासून बचावासाठी उपयुक्‍त टिप्‍स ते देतील. तसेच हृदयरोगाचे निदान झाल्‍यास संभाव्‍य उपचार पद्धतीच्‍या पर्यायांविषयी माहिती ते देणार आहेत.

डॉ.मनोज चोपडा हे हृदयविकार शास्‍त्रातील नवीन तंत्रज्ञानाबाबत माहिती देतील. सध्या हृदयविकाराच्‍या शाखेत अनेक अत्‍याधुनिक पर्याय उपलब्‍ध झालेले आहेत. यामध्ये औषधोपचारापासून शस्‍त्रक्रियांतील तंत्रज्ञानाचा समावेश आहे. या आधुनिक पर्यायांचा उपयोग करुन उपचाराची परिणामकारकता वाढविणे शक्‍य होऊ शकते. या सर्व बाबींचा आढावा डॉ.चोपडा आपल्‍या सादरीकरणातून करणार आहेत.यंदाच्या परिसंवादाचे सुत्रसंचालन किशोरी किणीकर करणार असून नंदन दिक्षित हे मुलाखत घेणार आहेत.  या परिसंवादामध्ये नाशिकसह जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मॅग्नम हॉर्ट इन्स्टिट्युटच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९११२२९११९९ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.