नाशिक,दि,२९ फेब्रुवारी २०२४ –नाशिक महानगर पालिकेने सुरु केलेल्या सिटीलिंक बस कर्मचारी पुन्हा (Nashik City Link Bus Strike) एकदा संपावर गेले आहे. त्यामुळे नाशिक शहरातील बस सेवा पुन्हा विस्कळीत झाली आहे सर्वसामान्य नागरिकांना सिटी लिंक कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका बसला आहे.गेल्या काही महिन्या पासून पगार न दिल्याने कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संपाचे हत्यार उपसले आहे.
अचानक केलेल्या या संपामुळे १२ वी च्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांसह चाकरमान्यांचे प्रचंड हाल होणार आहे. आज सकाळीच कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून नाशिकची लाईफ लाईन असलेल्या सिटी लिंक च्या संपा मुले नाशिकमधील जनजीवन विस्कळीत होणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून वारंवार वेतन थकत असल्याने कर्मचारी संपावर गेले आहेत. मागच्या काही दिवसांपूर्वीच संप झाल्यानंतर वेतन वेळेवर देण्याचे ठेकेदाराने आश्वासन दिले होते. मात्र ते आश्वासन कर्मचाऱ्यांना देऊन देखील वेतन न मिळत असल्याने कर्मचारी पुन्हा संतप्त झाले आहेत. नाशिक शहरातील बस सेवा पुन्हा विस्कळीत झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना सिटी लिंक कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका बसला आहे.
गेल्या दोन ते तीन महिन्याचा पगार थकल्याने सर्व कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उगारले आहे. अचानक काम बंद आंदोलन सुरु केल्याने नाशिक शहरातील बससेवा खंडित झाली आहे. नाशिकच्या सिटीलिंक बस कर्मचाऱ्यांकडून वारंवार आंदोलन केली जात असून आता त्यांनी पगार नाही, तर काम देखील नाही, अशी भूमिका घेतली आहे. आता सिटीलिंक व्यवस्थापन यावर काय तोडगा काढणार याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.
सिटी लिंक बस कर्मचाऱ्यांचे गेल्या दोन वर्षांपासून वेतनवाढ झालेली नाही. गेल्या दोन वर्षे कोणत्याही प्रकारचा बोनस देण्यात आलेला नाही. यासह कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह खात्यात निधी देखील भरलेला नाही. सिटीलिंक प्रशासन व ठेकेदार संगनमताने कर्मचारी वर्गाची दिशाभूल करीत असल्याचे वाहकांनी म्हटले आहे.