नाशिकमध्ये मद्यधुंद गुन्हेगारीचा कहर :तरुण ,तरुणीला अमानवी मारहाण:व्हिडिओ व्हायरल

0

नाशिक | २७ मे २०२५ – Nashik crime news  नाशिकच्या इंदिरानगर परिसरात पुन्हा एकदा मद्यधुंद गुन्हेगारीचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.इंदिरानगर परिसरातील बोगद्याजवळ मद्यधुंद तरुणीने गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आल्यानंतर आता अजून एक घटना घडल्यामुळे या नाशिक मध्ये चाललंय तरी काय असा प्रश्न सर्वसामान्य नाशिककरांना पडला आहे.नाशिक मध्ये दर दिवसाआड खुनाचे सत्र सुरु आहे, विशेषतः इंदिरानगर हायवे लगत असेलेल्या अनेक बीअर बार आणि वाईन शॉप मुळे मद्यपी लोकांचा या परिसरात सुळसुळाट झाला आहे. दाट झाडी आणि मोकळा परिसर यामुळे अनेकजण रस्त्यावर अथवा एखाद्या गाडीमध्ये सर्रास मद्यपान करत असतात लेखानगर समोर तर मद्यपींचा बाजाराचं भरलेला असतो .या कडे मात्र पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष असते का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

इंदिरानगर बोगद्याजवळ लघुशंकेसाठी थांबलेल्या एका तरुण व त्याच्या मैत्रिणीवर झाडीत बसून दारू पिणाऱ्या अज्ञात व्यक्तींनी बेदम मारहाण केल्याचा संतापजनक व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.

ही घटना केवळ अमानवी मारहाणीपुरती मर्यादित नाही, तर नाशिकमधील वाढत्या असुरक्षिततेचं आणि पोलिसांच्या वचकाच्या अभावाचं भयावह उदाहरण ठरत आहे. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी ही घटना घडली, त्या परिसरात पूर्वीही मद्यपी टोळक्यांमुळे तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, पोलीस प्रशासनाने वेळेवर लक्ष न दिल्यामुळे परिस्थिती आता बिघडली आहे.

मारहाणीचा व्हिडीओ समोर आल्यानंतर मुंबई नाका पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू आहे. तरीसुद्धा, सामान्य नाशिककरांच्या मनात प्रश्न उपस्थित होत आहे “शहरात कायद्याचा धाक उरला आहे का?”

दरम्यान, शहरातील अनेक बीअर बार, वाईन शॉप्स आणि अंधाऱ्या परिसरांमुळे इंदिरानगरसारख्या भागांत गुन्हेगारीच्या घटना (Nashik crime news )वाढीस लागल्याचं स्पष्ट होत आहे. यावर तत्काळ उपाययोजना न झाल्यास अशा घटनांची पुनरावृत्ती अटळ आहे.

समाजमाध्यमांवर व्हायरल झालेला व्हिडिओ

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!