Nashik Crime News:नाशिक पुन्हा हादरलं! २० वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या

1

नाशिक दिनांक : २७ मे २०२५ –  Nashik Crime News  नाशिक शहर पुन्हा एकदा गुन्हेगारीच्या घटनेने हादरले आहे. शिवाजीनगर परिसरात एका २० वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण खून करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून स्थानिक नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे.

मृत तरुणाची ओळख :
नसीम अकबर अली शहा (वय २०, रा. गुरुद्वारा रोड, म्हशीचा तबेला, सातपूर) असे मृत तरुणाचे नाव आहे.

घटनेचा तपशील :
गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवाजीनगर परिसरात काही अज्ञात व्यक्तींनी नसीम याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या नसीमला तत्काळ जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

प्रेमप्रकरण की वैयक्तिक वाद?
या हत्येमागे प्रेमप्रकरण किंवा मुलीच्या छेडछाडीचा वाद असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, नेमकं कारण अजूनही स्पष्ट नाही. अज्ञात आरोपीविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सध्या तपास करत आहेत.

परिसरात भीतीचं वातावरण :  (Nashik Crime News)
या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे.

पोलीस तपास सुरु :
गंगापूर पोलीस आरोपींचा शोध घेत असून लवकरच या प्रकरणाचा उलगडा होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. नाशिकमधील वाढत्या गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी पोलीस कोणती ठोस पावले उचलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

1 Comment
  1. […] Nashik Crime News:नाशिक पुन्हा हादरलं! २० वर्षीय … […]

Don`t copy text!