विधानसभा निवडणुकीसाठी नाशिक जिल्ह्यातून २०० उमेदवार रिंगणात :आज या उमेदवारांनी घेतली माघार
नाशिक,दि,४ नोव्हेंबर २०२४ – विधानसभा निवडणुकीत अर्ज माघारीचा आजचा शेवटचा दिवस असल्याने आज अनेक उमेदवारांनी माघार घेतली आहे.विधानसभा निवडणुकीसाठी नाशिक जिल्ह्यात एकूण ३३७ उमेदवारांचे अर्ज वैध झाले होते त्यापैकी आजच्या शेवटच्या दिवशी १३७ जणांनी माघार घेतल्यामुळे आता जिल्ह्यात २०० उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे.
आतापर्यंत नाशिक पश्चिम मतदार संघातून भाजपचे बंडखोर इंजिनीअर दिलीप भामरे, छावा चे करण गायकर, डॉ. डी एल. कराड, नाशिक मध्य मधून काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार हेमलता पाटील यांनीही पक्षाच्या वरीष्ठनेत्यांशी झालेल्या चर्चेनंतर माघार घेतली. मनसेचे अंकुश पवार यांनी माघार घेतली आहे. शेवटच्या टप्प्यात अजून कोण माघार घेतो याकडे लक्ष लागून आहे, करण गायकर यांनी पश्चिम मधून माघार घेतली असली तरी पूर्व मतदार संघातून त्यांची उमेदवारी कायम आहे.
महायुतीचे व एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे बंडखोर उमेदवार व माजी आमदार धनराज महाले यांनी उमेदवारी मागे घेतली, विशेष म्हणजे हेलिकॉप्टरने त्यांना एबी फॉर्म पाठवला होता.
मतदारसंघ निहाय आकडेवारी