नांदगाव मतदार संघात तब्बल १० अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा

0

नांदगाव,दि.४ नोव्हेंबर:२०२४ –आज उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी नांदगाव मतदार संघात तब्बल दहा उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेत अपक्ष उमेदवार मा.खा. समीर भुजबळ यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भुजबळ यांचे मतदारसंघातील पारडे जड झाले आहे. आता नांदगाव विधानसभा मतदार संघात भयमुक्त वातावरण होत विकासाची शिट्टी वाजणार आहे. जनतेतून सातत्याने समीर भुजबळ यांना सातत्याने पाठिंबा वाढत आहे.

गेले सहा महिन्यापूर्वी नांदगाव विधानसभा मतदारसंघातून कोण निवडणूक लढवणार अशी चर्चा असताना नांदगाव तालुक्यातील जनतेच्या आग्रहा खातर..समीर भुजबळ यांनी उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून नांदगावचे राजकीय वातावरण बदलून गेले आहे. सर्वसामान्य माणूस सुद्धा त्यांच्याकडे मोठ्या विकासाची अपेक्षा ठेवून आहे. नाशिकचा उड्डाणपूल असो की, विमान सेवा इतर विकास कामे त्याचबरोबर नाशिकच्या सौंदर्यात भर घालण्याचे मोलाचे काम समीर भुजबळ यांनी केले आहे

त्यामुळेच नांदगावकरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्याच आग्रहाखातर समीर भुजबळ यांना येथून उमेदवारीसाठी आग्रह करण्यात आला. कार्यकर्त्यांच्या भावना आणि जय्यत तयारी पाहून आणि गेले पाच वर्षांतील परिस्थिती बघता “भयमुक्त नांदगाव, प्रगत नांदगाव” अशी अचूक घोषणा त्यांनी केली आहे. जनसामान्यांच्या पाठबळावर त्यांनी प्रचंड रॅली काढत उमेदवारी अर्ज दाखल केला. तेव्हापासून त्यांना वाढता पाठिंबा मिळत आहे. आज अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी तब्बल १० अपक्ष उमेदवारांनी माघार घेत अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांना पाठिंबा दिला आहे. त्यात अॅड ज्ञानेश्वर शेलार, मुक्ताराम बागुल, सिध्देश्वर शिंदे, अशोक पाटील, आशिष गायकवाड, जयश्री शिंदे, भगवान सोनवणे, लक्ष्मीबाई गायकवाड, बाळू बोरकर, नेत्रा बोरकर आदींचा समावेश आहे. यामुळे भुजबळ यांचे पारडे जड झाले आहे.

शिट्टी चिन्ह मिळाले
चिन्ह वाटपाच्या वेळेस समीर भुजबळ यांना “शिट्टी” हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे भुजबळांच्या कार्यालयात शिट्टीचा एकच जल्लोष झाला. आता कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य पसरले असून भुजबळ यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

नांदगाव विधानसभा मतदारसंघ भयमुक्त करीत विकासाची शिट्टी आता वाजवणार आहे. जनतेने आपले बहुमोल मत माझ्या शिट्टी या निशाणीला देऊन मला विजयी करावे, असे आवाहन समीर भुजबळ यांनी केले आहे.

नांदगावच्या विकासासाठी आणि नांदगाव विधानसभा मतदारसंघातून “भय” हद्दपार करण्यासाठी मी माघार घेत माझा पाठिंबा समीर भुजबळ यांना देत आहे.
– भगवान (माऊली) सोनवणे, माघार घेतलेले उमेदवार

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.