आजचे राशिभविष्य मंगळवार ५ नोव्हेंबर २०२४

0

विनायकी चतुर्थी (अंगारक योग) शरद ऋतू, दक्षिणायन, शोभन नाम संवत्सर.
राहुकाळ – दुपारी १.४३ ते दुपारी ३.०७
“आज सकाळी ११.०० नंतर चांगला दिवस”
चंद्र नक्षत्र – ज्येष्ठा

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) पर्यटनावर खर्च कराल. मन अस्वस्थ राहू शकते. उच्च शिक्षणात यश मिळेल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) संमिश्र दिवस आहे. अचानक लाभाचे योग आहेत. योग्य संधी मिळेल, गाफील राहू नका.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) कामाच्या ठिकाणी सुखद अनुभव येतील. नवनवीन कल्पना सुचतील. लाभ होतील.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) उत्तम लाभ होतील. व्यवसायात वाढ होईल. आनंदी राहाल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) मन:स्वास्थ्य लाभेल. कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. जुने मित्र भेटतील.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) सामाजिक वजन वाढेल. धैर्य दाखवाल. दुर्बल लोकांना मदत कराल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अर्थचक्र गतिमान होईल. जोडीदाराची चांगली साथ लाभेल. शत्रू पराभूत होतात.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) उत्तम दिवस आहे. कामांना गती प्राप्त होईल. नवीन प्रवासाचे बेत आखाल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) पराक्रम गाजवण्याचा दिवस आहे. धाडसी निंर्णय घ्याल. गुंतवणूक कामी येईल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) प्रतिकूल दिवस आहे. मोठे निर्णय आज घेऊ नयेत. आरोग्याची काळजी घ्या.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अनुकूल दिवस आहे. लेखनातून कीर्ती संपादन कराल. तांत्रिक कौशल्य कामास येईल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) या वर्षात आज काही चांगले अनुभवायला मिळेल.कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी व्हाल श्री.हनुमान उपासना लाभदायक ठरेल.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.