
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Daily Marathi Horoscope)
अधिक ज्येष्ठ शुक्ल प्रतिपदा. ग्रीष्म ऋतू.
पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.
.⏰ राहुकाळ – सायंकाळी ४.३० ते ६.००
“आज मिश्र पण प्रगतीकारक दिवस आहे.”
आज करि दिन आहे. (अशुभ)
🌙 नक्षत्र – कृतिका / (दुपारी २.३२ नंतर) रोहिणी.
🌟 आज जन्मलेल्या बाळाची राशी – वृषभ. (अतिगंड योगाशी शांती करून घेणे)
१७ मे रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-(Daily Marathi Horoscope)
तुमच्यावर शनि, बुध आणि शुक्र ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही अत्यंत विचारी, महत्वाकांक्षी आहात. संघटन करणे तुम्हाला चांगले जमते. ठराविक चाकोरीतून जाणे तुम्हाला आवडत नाही. तुमचा विरक्तीकडे कल असतो. जीवनात बऱ्याच वेळेला अति कष्टाने यश साध्य होते. छोट्या छोट्या कामांमध्ये अडथळे येतात. तुमचे विचार क्रियाशील असतात. तुम्ही विधायक कामे करतात. तुम्ही शांतताप्रिय आहात. सामाजिक कामाची तुम्हाला आवड आहे. गूढ विद्यांबद्दल तुम्हाला आकर्षण असते. तुमचे व्यक्तिमत्व प्रभावी आहे. तुम्ही संशोधक आणि धाडसी वृत्तीचे असून तुम्ही स्वाभिमानी आहात. स्वतःच्या कल्पनेतून तुम्हाला यश मिळते. तुम्ही भित्रेपणा टाळला पाहिजे. तुमच्यात अभ्यासाची खोली, शिस्त, गांभीर्य आणि कर्तव्याची जाणीव आहे. तुम्ही स्थिर वृत्तीचे आहात. कोणत्याही घटनेचा समतोल विचार करण्याची तुमची वृत्ती आहे. अनेकदा तुम्ही इतर लोकांपेक्षा अधिक धोरणीपणे निर्णय घेतात. तुम्ही कार्यमग्न असतात मात्र बुद्धिमत्ता वापरून कार्य करण्याकडे तुमचा अधिक कल असतो. तुम्हाला दुर्बल लोकांबद्दल सहानुभूती वाटते. तुमचे व्यक्तिमत्त्व अभ्यासू आणि प्रसन्न आहे. कोणत्याही गोष्टीचा तुम्ही उत्तम पणे नियोजन करू शकतात. तुम्ही न्यायप्रिय आणि कायदा प्रेमी आहात. तुमचे आर्थिक नियोजन उत्तम असते. कठीण काळाचे नियोजन कसे करावे हे तुम्हाला चांगल्याप्रकारे माहिती असते.
व्यवसाय:- गणित, भौतिक, रसायन, वैद्यकीय, शास्त्र, संशोधन, प्रयोगशाळा, बँकिंग, वकिली.
शुभ दिवस:- बुधवार, गुरुवार, शुक्रवार.
शुभ रत्ने:- इंद्रनील, काळा मोती, हिरा.
शुभ रंग:- राखाडी, गडद निळा, काळा, जांभळा.
🔭 चंद्र युती बुध.
🔭 चंद्र लाभ शनी.
🔭 चंद्र युती हर्षल.
🔭 चंद्र लाभ नेपच्यून.
🔭 बुध युती हर्षल.
Daily Marathi Horoscope
मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) द्वितीय स्थानी चंद्र असल्याने आर्थिक लाभ होतील. आज अचानक धनप्राप्तीचे योग आहेत. मात्र बुध हर्षल युतीमुळे बोलण्यात गैरसमज निर्माण होऊ शकतात. कुटुंबीयांसोबत संयमाने वागा. नवीन खरेदीचा योग आहे.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) आज तुमच्याच राशीत चंद्र असल्याने आत्मविश्वास वाढेल. व्यक्तिमत्त्व आकर्षक वाटेल. हर्षल आणि बुध युतीमुळे नवीन कल्पना सुचतील. कलाकार, लेखक आणि संशोधकांना विशेष लाभ होतील. मात्र मानसिक चंचलता टाळा.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा) व्यय स्थानी चंद्र असल्याने खर्च वाढू शकतो. गुप्त चिंता मनाला त्रास देतील. प्रवासात अडथळे येण्याची शक्यता आहे. मात्र नेपच्यूनचा लाभयोग आध्यात्मिक प्रगतीस मदत करेल. ध्यान आणि उपासना लाभदायक ठरेल.
कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो) लाभ स्थानी चंद्र असल्याने मित्र आणि सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. आर्थिक प्रगतीचे मार्ग खुलतील. नवीन ओळखी लाभदायक ठरतील. चंद्र बुध युतीमुळे बुद्धिमत्तेचा प्रभाव पडेल. सामाजिक कार्यात मान सन्मान मिळेल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे) कर्मस्थानी चंद्र असल्याने नोकरी आणि व्यवसायात महत्त्वपूर्ण कामे पूर्ण होतील. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. बुध हर्षल योगामुळे अचानक निर्णय घ्यावे लागू शकतात. कामाचा ताण वाढेल पण यश मिळेल.
कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो) भाग्यस्थानी चंद्र असल्याने धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात रस वाढेल. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले यश मिळेल. गुरूजनांकडून मार्गदर्शन लाभेल. नवीन ज्ञान संपादन कराल.
तुळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अष्टम स्थानी चंद्र असल्याने मानसिक अस्वस्थता जाणवू शकते. अचानक खर्च संभवतात. आरोग्याची काळजी घ्या. अतिगंड योगामुळे वादविवाद टाळावेत. मात्र संशोधन आणि गूढ विषयात प्रगती होईल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु) सप्तम स्थानी चंद्र असल्याने वैवाहिक जीवनात आनंद मिळेल. जोडीदारासोबत वेळ चांगला जाईल. भागीदारीच्या कामात लाभ संभवतो. काही जुने गैरसमज दूर होतील. व्यवसायिक व्यवहारात सावधगिरी बाळगा.
धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) षष्ठ स्थानी चंद्र असल्याने कामाचा ताण वाढेल. विरोधकांवर मात करण्यात यश मिळेल. आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न कराल. महिलांकडून लाभ होतील. नोकरीत प्रगतीची शक्यता आहे.
मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी) पंचम स्थानी चंद्र असल्याने कला, साहित्य आणि सर्जनशील क्षेत्रात यश मिळेल. प्रेमसंबंधात आनंददायक घटना घडतील. संततीकडून चांगली बातमी मिळू शकते. आर्थिक लाभाचे संकेत आहेत.
कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा) चतुर्थ स्थानी चंद्र असल्याने घरगुती वातावरणात बदल जाणवतील. स्थावर मालमत्तेच्या बाबतीत लाभ संभवतो. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. मानसिक समाधानासाठी शांतता आवश्यक आहे. वाहन चालवताना सावध राहा.
मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची) तृतीय स्थानी चंद्र असल्याने धाडस आणि आत्मविश्वास वाढेल. भावंडांचे सहकार्य लाभेल. छोट्या प्रवासाचे योग संभवतात. बुध हर्षल योगामुळे नवीन तांत्रिक कल्पना सुचतील. लेखन आणि कला क्षेत्रात यश मिळेल.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – .ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521)



