Nashik:इंदिरानगर कक्षांतर्गत “या” दिवशी वीजपुरवठा बंद राहणार
नाशिक स्मार्ट सिटीच्या माध्यमातून विद्युत वाहिनी भूमिगत करण्याचे काम,खांब व रोहित्रांचे स्थलांतरण होणार
नाशिक, दि. ७ जुलै २०२५ – Nashik Electricity Shutdown महावितरणच्या नाशिक शहर विभाग २ अंतर्गत येणाऱ्या द्वारका उपविभागातील इंदिरा नगर कक्षातील वीज यंत्रणेमध्ये सुधारणा करण्यासाठी नियोजित काम हाती घेण्यात आले आहे. शिवाजीवाडी विद्युत उपकेंद्रातून निघणाऱ्या ११ केव्ही उच्चदाब वीज वाहिन्यांखालील भागात भूमिगत वीज वाहिनी टाकण्याचे तसेच विद्यमान रस्त्यांच्या मधोमध असलेल्या वीज खांब आणि रोहित्रांचे स्थलांतरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. हे संपूर्ण काम नाशिक स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत राबवले जात आहे.
या कामामुळे पुढील तारखांना संबंधित भागात वीजपुरवठा बंद राहणार आहे:(Nashik Electricity Shutdown)
🔌 ८ ते १० जुलै २०२५ – दररोज सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत
🔌 १२ जुलै २०२५ (शनिवार) – सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत
महावितरणने नागरिकांना सूचित केले आहे की, काम पूर्ण होईपर्यंत निर्धारित वेळेत वीजपुरवठा बंद राहील. मात्र नियोजित वेळेपूर्वी काम पूर्ण झाल्यास तत्काळ वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येईल.
या भागात वीजपुरवठा बंद राहणार:
🔷 ११ केव्ही भारत नगर वाहिनी अंतर्गत भाग:
खोडे नगर, विठ्ठल मंदिर परिसर, वडाळा गाव, गणेश नगर, रहमत नगर, रविशंकर मार्ग
🔷 ११ केव्ही कल्पतरू नगर वाहिनी अंतर्गत भाग:
अशोका मार्ग, गोदावरी नगर, कुरुडकर नगर, बनकर मळा, मातोश्री कॉलनी, निसर्ग कॉलनी, पखाल रोड, गोरे हॉस्पिटल परिसर, विधाते नगर, विठ्ठल मंदिर, पंडित रविशंकर मार्ग
🔷 ११ केव्ही डीजीपी नगर वाहिनी अंतर्गत भाग:
साई संतोषी नगर, एस. एन. पार्क, साठे नगर, मदिना नगर, सादिक नगर, गुलशन नगर, मुमताज नगर, म्हाडा कॉलनी, वडाळा गाव, मेहबूब नगर
महावितरणच्या वतीने नागरिकांना विनंती करण्यात आली आहे की, वीजबंद वेळेत त्यांनी आवश्यक ती तयारी करावी व सहकार्य करावे. हे काम स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडेशनचा भाग असल्याने नागरिकांनी थोडा संयम बाळगावा. वीजवाहिन्या भूमिगत झाल्याने भविष्यात वीजपुरवठा अधिक सुरक्षित व सातत्यपूर्ण होणार आहे.